पैसा हातात अजिबात टिकत नाही अशी तक्रार अनेक जणांची असते. पैसे येतातही आणि लगेच खर्चही होऊन जातात. खर्च करत असताना काही जाणवत नाही. पण नंतर मात्र महिना अखेर जवळ आल्यानंतर पैशांची टंचाई जाणवायला लागते आणि आपण काही बचतच केली नाही, याची जाणीव होते. हे टाळायचं असेल तर पुढे सांगितलेल्या काही साध्या सोप्या गोष्टी करून पाहा... सुरुवातीला जड गेलं तरी हळूहळू त्यांची सवय लागेल आणि मग पैसा हातात टिकून राहील. एवढंच नाही तर तो उत्तरोत्तर वाढतही जाईल.
पैसा हातात कायम टिकून राहावा यासाठी उपाय
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा दिवसभराचा खर्च लिहून काढण्याची सवय लावा. खर्च लिहिला की आपोआप आपण किती पैसे खर्च करतो आहोत, कशावर पैसा खर्च होत आहे याचा अंदाज यायला सुरुवात होते आणि मग त्यानुसार आपण खर्चाचं नियोजन करू शकतो. म्हणून अगदी २० रुपये जरी खर्च केले असतील तर ते देखील लिहून ठेवण्याची सवय लावा.
उन्हाळ्यात दही खावं का? कुणी-किती आणि कधी खावं, आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला दही जरा जपून..
२. कोणतेही अनावश्यक खर्च टाळा. बऱ्याचदा आपल्याला काहीच घ्यायचं नसतं. पण सहज दुकानात दिसलं किंवा मग ऑनलाईन साईटवर सर्फिंग करताना दिसलं म्हणून घेऊन टाकलं, असं होऊ देऊ नका. यामुळे विनाकारण खूप पैसा खर्च होतो.
३. काही ना काही गुंतवणूक करा आणि ती दिवसेंदिवस वाढवत न्या. गुंतवणूक तर सुरू आहे, पण ती उत्पन्नानुसार वाढत नाहीये किंवा २ वर्षांपुर्वी जेवढी किंमत गुंतवत होतात, तेवढीच आजही गुंतवत आहात तर त्यात फायदा नाही. गुंतवणुकीचा आकडाही दरवर्षी चढा राहायला हवा.
ऋजुता दिवेकरांचा सल्ला- मधुमेहींसाठी 'ही' गोष्ट ठरते गेम चेंजर, शुगर कंट्रोलमध्ये आणि तब्येत ठणठणीत
४. काही ना काही आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा. मग ते शॉर्ट टर्म असो किंवा लाँग टर्म.. पण उद्दिष्ट मात्र हवे. कारण समोर आपले ध्येय दिसले की आपले प्रयत्नही आपोआप वेगात सुरू होतात.
Web Summary : Many complain money doesn't last. Track expenses, avoid unnecessary purchases, invest consistently, and set financial goals. These habits help save money and grow wealth steadily.
Web Summary : कई लोगों की शिकायत है कि पैसा नहीं टिकता। खर्चों पर नज़र रखें, अनावश्यक खरीदारी से बचें, लगातार निवेश करें और वित्तीय लक्ष्य निर्धारित करें। ये आदतें पैसे बचाने और धन को लगातार बढ़ाने में मदद करती हैं।