Lokmat Sakhi >Social Viral > World Environment Day 2025 : आपलं घर ‘कचरा डेपो’ बनत आहे, बघा घरात किती धोकादायक कचरा आहे!

World Environment Day 2025 : आपलं घर ‘कचरा डेपो’ बनत आहे, बघा घरात किती धोकादायक कचरा आहे!

World Environment Day 2025 : आपणच जर पर्यावरणाला घातक कचरा तयार करतोय तर परिणामही आपणच भोगणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2025 17:50 IST2025-06-05T17:46:42+5:302025-06-05T17:50:33+5:30

World Environment Day 2025 : आपणच जर पर्यावरणाला घातक कचरा तयार करतोय तर परिणामही आपणच भोगणार!

World Environment Day 2025: Our home is becoming a 'dustbin of waste', look how much hazardous waste is in the house! | World Environment Day 2025 : आपलं घर ‘कचरा डेपो’ बनत आहे, बघा घरात किती धोकादायक कचरा आहे!

World Environment Day 2025 : आपलं घर ‘कचरा डेपो’ बनत आहे, बघा घरात किती धोकादायक कचरा आहे!

Highlightsआपल्या घराचं ऑडिट आपण केलं तर कळेल आपणच पर्यावरणाला घातक कचरा घरात तयार करतो आहोत.

पर्यावरण दिनाला (world environment day 2025) तुम्हाला कुणी असं सांगितलं की तुमच्या घरात खूप कचरा आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला धोका आहे, तर विश्वास ठेवाल? कुणीच नाही कबूल करणार. पण आपल्या सगळ्यांची घरं पर्यावरणाला घातक कचऱ्याने भरलेली आहे. ना आपण तो कमी करतो ना नियोजन करतो. आपण फक्त तो वाढवतो आहोत. कसा, ही यादी वाचा मग सांगा, तुमच्या घरात घातक कचरा आहे की नाही?

 

आपल्यामुळे होतेय पर्यावरणाचे नुकसान?

१. घराची स्वच्छता करण्यासाठी लागणारे केमिकल्स तर भरमसाठ असतात. महागही असतात. ते स्वच्छता किती करतात माहिती नाही पण त्यामुळे आपल्या अवतीभोवतीचे चांगले बॅक्टेरिया कमी होतातच. आपण केमिकलवालं पाणी सरळ ड्रेनेजमध्ये सोडून देतोय, ते ही रोज.

२. घरातल्या प्रत्येक माणसाचे कपडे, शूज, मेक अप किट्स, लोशन्स, औषधं, विविध प्लास्टिकच्या वस्तू, शोभेच्या वस्तू या सामानाची विल्हेवाट लागायला किती वर्ष लागतील याचा आपण विचार करतो का?

३. प्लास्टिकच्या पिशव्या किती साठल्या घरात, ऑनलाइन जेवण मागवलं की त्याचे प्लास्टिक डबे, विचार करा किती साठले आहेत.


४.  चार्जर्स, हेडफोन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणारे नवे-जुने सेल, जुने मोबाईल, खराब झालेले गॅजेट्स वायरींचा गुंता हा सारा इलेक्ट्रॉनिक कचरा, त्याची विगतवारी आपण कशी लावणार?

५. घरात किती पेन आणि पेन्सिल, तेलखडू आहेत मुलांचे, तो कचरा कुठं टाकणार?

६. घरातली कपाटं आणि वेगवेगळे कप्पे सामानाने ओसंडून वाहत आहेत, लागेल केव्हातरी म्हणून आपण किती वस्तू जमवल्या आहेत. त्याचं काय करणार?

७. औषधं किती साठली आहेत घरात?

८. लहान मुलांची खेळणी, तुटकी खेळणी त्याचं काय करणार?

९. विविध औषधं अर्धवट तशीच पडून आहेत ती कुठं फेकणार?

१०. मेकअपचं सामान, ते वापरतोय का आपण? की फेकून देणार डेट उलटली म्हणून..

करा घराचं ऑडिट
आपल्या घराचं ऑडिट आपण केलं तर कळेल आपणच पर्यावरणाला घातक कचरा घरात तयार करतो आहोत. त्यातलं काही बाहेर फेकतो, पुढे शेकडो वर्षे त्याचं विघटन होणंच शक्य नाही. मग सांगा, पर्यावरण दिनाचं आपल्याला काय मोल आहे?

 

Web Title: World Environment Day 2025: Our home is becoming a 'dustbin of waste', look how much hazardous waste is in the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.