Weight Loss Injection Side Effects : औषधांच्या साइड इफेक्ट्सचा सामना बऱ्याच लोकांना करावा लागतो. साधेसुधे साइड इफेक्ट्स दिसणं कॉमन आहे. पण कधी कधी साइड इफेक्ट्स खूप जास्त त्रासदायक असतात. एका महिलेसोबत असंच झालंय. या महिलेने वजन कमी करण्याचं इंजेक्शन घेतलं, पण त्यानंतर आता ती घरातून बाहेरही जाऊ शकत नाहीये. चला पाहुयात काय झालं तिच्यासोबत नेमकं...
वजन कमी करण्याचं इंजेक्शन घेतलेल्या या महिलेने दावा केला की, मौनजारो वजन कमी करणारं इंजेक्शन १९ आठवडे घेतल्यानंतर तिची अशी अवस्था झाली आहे की, टॉयलेटच्या बाहेर जाण्याची हिंमत होत नाहीये. मॅडी नावाच्या कन्टेन्ट क्रिएटरनं सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला. मॅडीनं सांगितलं की, आतापर्यंत मौनजारोच्या मदतीनं जवळपास १८ किलो वजन कमी केलं. पण आता तिला डायरिया, उलटी आणि अॅसिडिक ढेकरा येत आहेत. ज्यामुळे ती कामावर जाऊ शकत नाहीये.
एका व्हायरल व्हिडिओत मॅडी बाथरूममध्ये उभी राहून सांगत आहे की, तिनं हातात वजन कमी करणारं इंजेक्शन घेतलं आणि त्यांतर तिची तब्येत बिघडली. उलटी, गॅस आणि दुर्गंधीसोबत ढेकर असं सगळं सुरू आहे. महिलेनं पुढे सांगितलं की, मंगळवारी इंजेक्शन घेतल्यानंतर बुधवारी दुपारी तिला स्लफर बर्प्स येऊ लागल्या. गुरूवारी सकाळी तिची तब्येत आणखी जास्त बिघडली. तिला पुन्हा पुन्हा टॉयलेटला जावं लागलं.
लोकांनीही अनुभव केले शेअर
वजन कमी करणारं मौनजारो इंजेक्शन घेतलेल्या इतरही लोकांनी व्हिडिओवर कमेंट करत त्यांचे अनुभव सांगितले. एकानं लिहिलं की, "सल्फर बर्प्स सहन करण्यापलिकडे आहे. मी काल इंजेक्शन घेतलं आणि आज हालत खराब झाली आहे'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, " पहिल्यांदा पोटात इंजेक्शन घेतलं तेव्हा सगळं ठीक होतं. काल हातात घेतलं आणि आज खूप जास्त थकवा जाणवत आहे".
Chemist4U च्या हेड ऑफ फार्मसी जेसन मर्फी या सांगतात की, "इंजेक्शन साइटनं साइड इफेक्ट्सवर प्रभाव पडू शकतो. क्लीनिकली ट्रायलमध्ये आढळून आलं आहे की, पोटात इंजेक्शन घेतल्यावर ६८ टक्के साइड इफेक्ट्स, हातात घेतल्यावर ५७ टक्के आणि मांडीत घेतल्यावर ४३ टक्के साइड इफेक्ट्स दिसले". तसेच ऑक्सफोर्ड ऑनलाइन फार्मसीचे फार्मासिस्ट किरण जोन्स म्हणाले की, "प्रत्येकाच्या शरीरातील चरबीची विभागणी, ब्लड फ्लो आणि त्वचेचा जाडपणा वेगवेगळा असतो, ज्यामुळे रिअॅक्शनही वेगळे असू शकतात.