Lokmat Sakhi >Social Viral > बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video

बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video

एका महिलेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. युजर्स देखील व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:38 IST2025-09-08T14:35:02+5:302025-09-08T14:38:30+5:30

एका महिलेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. युजर्स देखील व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत.

woman seen taking care of her disabled husband like child viral video is pure gold | बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video

बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video

जर प्रेम आणि आदर असेल तर पती-पत्नीचं नातं जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे. आजच्या युगात लग्नानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. प्रेमप्रकरणासाठी अनेक महिलांनी आपल्याच नवऱ्याचा काटा काढला आहे. त्यामुळे या सुंदर नात्यावरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

एका महिलेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. युजर्स देखील व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत. इन्स्टाग्रामवर Flix.indian नावाच्या युजरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या दिव्यांग पतीची लहान मुलासारखी काळजी घेत असल्याचं दिसून येतं. ती व्हीलचेअरवर बसलेल्या तिच्या पतीला उचलून घेऊन घराकडे चालत जाते. याच दरम्यान, दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसतो. 


इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. २० हजारांहून अधिक युजर्सनी व्हिडिओला लाईक केलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये, युजर्सनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जोडप्यामधील प्रेम पाहून लोक भारावून गेले आहेत. त्यांनी जोडप्याचं खूप कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी त्यांच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे.

युजर्स म्हणतात की, जर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती मिळाली जी तुम्हाला अशी साथ देईल तर लग्न एका सुंदर स्वप्नासारखं होईल. व्हायरल व्हिडिओमध्ये जोडप्यामधील अतूट प्रेम दिसून येतं, जे युजर्सच्या हृदयाला स्पर्शून गेलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वत्र याची चर्चा रंगली आहे. 

Web Title: woman seen taking care of her disabled husband like child viral video is pure gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.