Steel Bottle Smell : पर्यावरणासोबतच आपल्या शरीराचं देखील नुकसान होऊ नये म्हणून बरेच लोक अलिकडे प्लास्टिकऐवजी स्टेनलेस स्टीलच्या बॉटलचा वापर करू लागले आहेत. स्टीलची बॉटल वापरत असताना आपण पाहिलं असेल की, यातील पाण्याची टेस्ट अनेकदा धातुसारखी लागते किंवा तसा वास येतो. अनेकदा बॉटल घासूनही असंच होतं. पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशात डायटिशिअन अनुषी जैन सांगतात की, पाण्याची धातुसारखी टेस्ट लागण्याचं कारण अनेकदा पाणी नाही तर बॉटलची गुणवत्ता असतं. एक्सपर्ट आणि काही रिसर्चनुसार, स्टीलच्या बॉटलमधील पाण्याची टेस्ट बदलण्यामागे खराब क्वालिटी मटेरिअल, ऑक्सीकरण किंवा बॅक्टेरिया जमा होणं यांसारखी काही कारणे असू शकतात. अशात आपण जाणून घेऊया की, स्टीलच्या बॉटलमधील पाण्याची टेस्ट धातुसारखी का लागते.
स्टीलच्या बॉटलमधील पाण्याला धातुची टेस्ट का येते?
एक्सपर्ट सांगतात की, पाण्याला धातुसारखी टेस्ट येण्यास अनेकदा कमी गुणवत्ता असलेलं स्टेनलेस स्टील किंवा बॉटलच्या आतल्या भागातील खराब फिनिशिंग या गोष्टी कारणीभूत असू शकतात. सगळेच स्टेनलेस स्टील एकसारखे नसतात. हाय क्वालिटी असलेले स्टेनलेस स्टील खासकरून ३०४ किंवा ३१६ ग्रेडला पिण्याचं पाणी ठेवण्यासाठी सुरक्षित मानलं जातं. या ग्रेडच्या स्टीलने पाण्याची टेस्ट बदलत नाही.
स्वस्त बॉटल - क्वालिटी खराब
एक्सपर्ट सांगतात की, सामान्यपणे स्वस्त बॉटल कमी गुणवत्तेच्या स्टीलपासून बनवल्या जातात किंवा त्यांचा आतील भागाला व्यवस्थित पॉलिश केलं जात नाही. काळानुसार ओलावा, गरमी किंवा आंबट पेय जसे की लिंबू पाण्याने बॉटलच्या आतील भाग हलकी प्रतिक्रिया करू शकतं. ज्यामुळे पाण्याची टेस्ट धातुसारखी लागू शकते. योग्य पद्धतीने स्वच्छता न करणं देखील याचं कारण ठरू शकतं. जर नळाच्या पाण्यातील खनिज किंवा जुन्या बॉटलचे अवशेष बॉटलमध्ये जमा होतात, यानेही पाण्याची टेस्ट बदलू शकते.
कोणती बॉटल सुरक्षित?
अनेकांचा असा समज असतो की, डेबल - लेअर स्टीलची बॉटल जास्त सुरक्षित असते. पण हे पूर्ण सत्य नाही. डबल - लेअर बॉटल पाण्याला रासायनिक रूपाने अधिक सुरक्षित बनवत नाही. पाण्याची सुरक्षा सामान्यपणे वापरण्यात आलेल्या स्टीलच्या ग्रेडवर अवलंबून असते. डबल लेअर बॉटल फक्त तापमान कायम ठेवते आणि बाहेरच्या तापमानाचा प्रभाव कमी करते, ज्यामुळे पाणी जास्तवेळ थंड राहतं. याचा फायदा उन्हाळ्यात अधिक होतो. कारण जास्त वेळ गरम तापमानावर ठेवलेल्या पाण्यात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. जर आपण पाणी दिवसभर सोबत ठेवत असाल तर इन्सुलेटेड बॉटल सिंगल - लेअर बॉटलच्या तुलनेत अधिक चागंली ठरते.
पाण्याचा धातुसारखा वास येऊ नये यासाठी उपाय
एक्सपर्ट सांगतात की, ३०४ किंवा ३१६ ग्रेड स्टीलपासून बनवलेल्या बॉटलची निवड करा.
आंबट पेय जास्त वेळ स्टीलच्या बॉटलमध्ये ठेवू नका.
बॉटल नेहमी लिक्विडने धुवून आतून पूर्ण सुकू द्या.
बॉटल फार जुनी असेल तर लगेच बदला.
बॉटल कशी चेक कराल?
बॉटलच्या आत टॉर्चने बघा. जर आत खालच्या भागात छोटे भुरके डाग किंवा पांढरे खनिज जमा दिसत असतील तर मेटलसारखी टेस्ट त्यामुळेच येत आहे.
अनेकदा वास बॉटलमुळे नाही तर झाकणाऱ्या रबरमुळेही येऊ लागतो. रबर काढा आणि त्याचा वास बघा. जर त्यातून वास येत असेल तर व्हिनेगरमध्ये भिजवून स्वच्छ करा.
बॉटल रिकामी करा आणि वास घेऊन बघा. जर बॉटलमधून नाण्यांसारखा वास येत असेल तर याचा अर्थ आहे की, स्टीलचा सुरक्षित थर खराब झाला आहे असं समजा.
Web Summary : Metallic taste in steel bottles stems from low-quality steel, poor finishing, or bacteria. High-grade steel (304/316) is safer. Clean regularly, avoid storing acidic drinks long-term, and replace old bottles. Check for residue and rubber seal odors.
Web Summary : स्टील की बोतलों में धातु जैसा स्वाद कम गुणवत्ता वाले स्टील, खराब फिनिशिंग या बैक्टीरिया के कारण होता है। उच्च श्रेणी का स्टील (304/316) सुरक्षित है। नियमित रूप से साफ करें, अम्लीय पेय को लंबे समय तक रखने से बचें और पुरानी बोतलों को बदलें। अवशेषों और रबर सील की गंध की जाँच करें।