मोबाईल जसा आता हाताहातात आलेला आहे तसंच आता इंस्टाग्राम, फेसबूक यासारखे ॲप्सही प्रत्येक मोबाईलमध्ये आलेले आहेत. या ॲप्सचे नोटीफिकेशन्स, त्यांच्यावर येणारे रिल्स, व्हिडिओ, व्हायरल पोस्ट हे सगळं बघत बघत कसा वेळ निघून जातो ते ही कळत नाही. हल्ली कित्येक लोक तर इंस्टा, फेसबूक बघता बघता तासंतास त्यात रमून जातात आणि आपण मोबाईल हातात का घेतला होता ते देखील विसरतात. या ॲप्सच्या माध्यमातून आपल्या नवऱ्याच्या किंवा बायकोच्या प्रत्येक सोशल मीडिया कृतीवर लक्ष ठेवून असणारेही कित्येक महाभाग आहेत. मग आपला पार्टनर कोणाला फॉलो करतो, कोणाला लाईक करतो, कोणते व्हिडिओ पाहातो, यावर करडी नजर ठेवली जाते. त्यातून मग कित्येक वादही होतात. अशाच एका वादाची मजेशीर घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली...
ज्यांच्यामध्ये हा वाद झाला त्या दोघीही एकमेकींच्या शेजारणी. त्या दोघीही सोशल मीडियावर आहेत. त्यातच असं झालं की इंस्टाग्राम पाहात असताना एक जण अचानक खूप चिडली. कारण तिला असं लक्षात आलं की तिच्या नवऱ्याला तिच्या शेजारणीने इंस्टाग्रामवर फॉलो केलं आहे.
'या' पद्धतीने आय लायनर लावा- बारीक डोळेही दिसतील टपोरे आणि चेहरा वाटेल रेखीव
ते पाहून ती संतापली आणि रागाच्या भरातच तावातावाने शेजारणीच्या घरी गेली. माझ्या नवऱ्याला तू 'इंस्टा'वर फॉलो का केलंस? असं म्हणत तिच्याशी जोरजोरात भांडू लागली. मी नाही तर तुझ्या नवराच मला सोशल मीडियावर फॉलो करत आहे, असं शेजारीण तिला समजावून सांगत होती. पण ती काही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हती.
सुरुवातीला होणाऱ्या शाब्दिक चकामकी नंतर उग्र रूप घेऊ लागल्या आणि त्या दोघीही हाणामारीवर आल्या. एकमेकींच्या झिंज्या ओढून मारू लागल्या. आजुबाजुच्या महिलाही तिथे जमा झाल्या आणि दोघींची भांडणं सोडवायचा प्रयत्न करू लागल्या.
आधी काठी घेऊन चालणाऱ्या हेलन आता करतायेत दणादण व्यायाम, बघा कसा झाला हा जादुई बदल...
शेवटी हे प्रकरण एवढं विकोपाला गेलं एकीने दुसरीच्या डोक्यात दगड घालता आणि ही भांडणं पोलीस ठाण्यापर्यंत गेली. हा विषय दिवसभर त्या गल्लीसाठी चर्चेचा विषय ठरला असणार. सोशल मीडिया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अशा कित्येक भांडणांसाठी कारणीभूत ठरत असेल हे सांगताच येत नाही..
