Lokmat Sakhi >Social Viral > पुरुषांपेक्षा महिला अंधश्रद्धांना जास्त बळी पडतात, असं का? कशाची भीती महिलांना जास्त वाटते..

पुरुषांपेक्षा महिला अंधश्रद्धांना जास्त बळी पडतात, असं का? कशाची भीती महिलांना जास्त वाटते..

Why are women more susceptible to superstitions than men? : अंधश्रद्धांमुळे फसगत होण्याची शक्यता वाढते आणि त्यातून आर्थिक मानसिक शारीरिक नुकसानही होते

By चैताली मेहेंदळे | Updated: February 19, 2025 17:31 IST2025-02-19T16:20:20+5:302025-02-19T17:31:19+5:30

Why are women more susceptible to superstitions than men? : अंधश्रद्धांमुळे फसगत होण्याची शक्यता वाढते आणि त्यातून आर्थिक मानसिक शारीरिक नुकसानही होते

Why are women more susceptible to superstitions than men? | पुरुषांपेक्षा महिला अंधश्रद्धांना जास्त बळी पडतात, असं का? कशाची भीती महिलांना जास्त वाटते..

पुरुषांपेक्षा महिला अंधश्रद्धांना जास्त बळी पडतात, असं का? कशाची भीती महिलांना जास्त वाटते..

भारतात संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे महत्व मोठे आहे. मात्र त्यातले चांगले ते घ्यावे, वाढवावे आणि अंधश्रद्धा टाळणंही महत्वाचं आहे. (Why are women more susceptible to superstitions than men? )आजही अनेकजण अंधश्रद्धा पाळतात, इतकं की मांजर आडवं गेलं म्हणून रस्ता बदलतात. दारापाशी शिंका आली की, लगेच जाऊ नये म्हणतात किंवा काच फुटली की काहीतरी चांगलं घडेल असंही म्हणतात किंवा अपशकूनही म्हणतात. (Why are women more susceptible to superstitions than men? )शकून अपशकूनाचा खेळ तर अनेकांच्या मनात असतो. हे कमीच म्हणून कुठंतरी पाखंडी बाबाबुवांच्या मागे लागून फसणाऱ्या महिलापुरुषांचे प्रमाणही मोठे आहे. सर्व धर्मांमध्ये या अंधश्रद्धा दिसतात, भोंदू  त्यांना फशी पाडतात. मात्र पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अंधश्रद्धांचे प्रमाण जास्त असते का?

अंधश्रद्धा आणि महिला..(Why are women more susceptible to superstitions than men? )
'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनाही हाच प्रश्न विचारला की महिलांमध्ये अंधश्रद्धांचे प्रमाण जास्त असते का? ते सांगतात, "पहिल्या १०० केस ज्या नोंदवल्या गेल्या, त्या जास्त महिलांसंदर्भातचं होत्या. १०० पैकी ८० प्रकरणामध्ये महिलाच अंधश्रद्धांना बळी पडलेल्या दिसतात. भारत पुरूष प्रधान देश आहे. महिलांना अनेक प्रथापरंपराचे पिढीजात पालन करावे लागते. आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार महिलांवर अंधश्रद्धेचा प्रभाव जास्त आहे असेच दिसून येते.

अजून एक कारण म्हणजे  भारतात आजही काही ठिकाणी स्त्री-साक्षरतेला महत्व दिले जात नाही. अज्ञानामुळे महिला विचार न करता कशावरही विश्वास ठेवतात. आजूबाजूला काय चालले आहे, त्याची महिलांना कल्पनाच नसते. त्यामुळे अंधश्रद्धेला महिला बळी पडतात.
त्यात महिलांना घरातील सर्वांचीच जीवापाड काळजी घेण्याची सवयच  असते. मातृत्वाची भावना त्यांच्यात असते. त्यामुळे जेव्हा कोणी बाळासाठी, नवऱ्यासाठी काही करायला सांगते त्यांना ते केल्याशिवाय चैन पडत नाही. जसे की, अनवाणी फिरलात तर तुमच्या मुलाचे आयुष्य वाढेल. असा दावा एखाद्या ढोंग्याने केला की, महिला लगेच त्यांचे ऐकतात. करून बघण्यात तोटा तर नाही ना ही मानसिकता महिलांची असते. ही मानसिकताच चुकीच्या प्रथांना दुजोरा देते.


सुशिक्षित महिलाही अंधश्रद्धेला बळी पडतात. त्यामुळे फक्त सुशिक्षित असून उपयोग नाही. सुजाण होणेही गरजेचे आहे. तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर अनेक गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे.

Web Title: Why are women more susceptible to superstitions than men?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.