Join us

श्रेयस अय्यरच्या मोबाइल वॉलपेपरवर पाहा कुणाचा फोटो? चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्यावर दिसला ‘तो’ खास फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 20:05 IST

Whose photo is on Shreyas Iyer's mobile wallpaper? See 'That' special photo : श्रेयस अय्यर त्याच्या खेळीनंतर झालाय चांगलाच व्हायरल पण 'या' कारणासाठी.

२०२५ची आयसीसी चॅम्पिअन्स ट्ऱॉफी ही भारताच्या खात्यात जमा झाली आहे. (Whose photo is on Shreyas Iyer's mobile wallpaper?  See 'That' special photo )वर्षाच्या सुरवातीलाच मोलाचा विजय भारताने मिळवला आहे. सगळ्याच खेळींमध्ये भारताने उत्तम कामगिरी केली आहे.  तब्बल १२ वर्षांनंतर ही चॅम्पिअनशीप भारताने जिंकली. संपूर्ण भारतातून लोक आनंद व्यक्त करत आहेत. सर्वच खेळाडूंच्या योगदानामुळे ही ट्रॉफी भारतामध्ये आली. प्रत्येकानेच आपापली खेळी उत्कृष्टपणे लढवली. सगळ्यांचेच कौतुक केले जात आहे.(Whose photo is on Shreyas Iyer's mobile wallpaper?  See 'That' special photo ) काहींच्या काही चुका झाल्या त्यावरून त्यांना नेटकऱ्यांनी  ट्रोलही केलं. मात्र  श्रेयस अय्यरने कोणाला काही खोट काढायची संधीच दिली नाही. त्याने कोणत्याच मॅचेमध्ये स्वत:चा फॉर्म सुटू दिला नाही. सध्या सर्वांच्या ओठी श्रेयस अय्यरचेच नाव आहे. भारताच्या फलंदाजीचा 'की प्लेयर' असे त्याला संबोधले जात आहे.

 

चॅम्पिअन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीमध्ये श्रेयस अय्यर दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने २४३ धावा केल्या आहेत. अंतिम खेळीमध्ये तो ४८ धावांवर बाद झाला. त्याने केलेली कामगिरी भारतीय गटासाठी फार महत्त्वाची ठरली. श्रेयसच्या या यशासाठी त्याची वाहवाह तर झालीच, मात्र अजून एका गोष्टीसाठी सध्या तो चर्चेत आहे. ते म्हणजे मातृप्रेम. भारत विजेता झाल्यावर श्रेयस अय्यर त्याच्या आईला आनंदाने मिठी मारताना दिसला. सामना पाहायला श्रेयसच्या आई व बहिणीने हजेरी लावली होती. त्यांना पाहताच तो एकदम खूष झाला. त्या दोघींना मिठी मारून त्याने आनंद व्यक्त केला.

 

श्रेयस अय्यर त्याच्या आईबरोबर सतत काही ना काही पोस्ट करतच असतो. इंस्टाग्रामला आईबरोबर क्रिकेट खेळतानाची त्याने टाकलेली स्टोरीही फार व्हायरल झाली होती. श्रेयस अय्यरच्या मोबाइलचा वॉलपेपरही आईबरोबरचाच फोटो आहे. या वर्षी तो खेळणार का नाही अशी स्थिती होती . मात्र तो खेळलाही आणि त्याने गाजवलेही. श्रेयस अय्यर त्याच्या मुलाखतींमध्ये नेहमी सांगताना दिसतो की, तो जे आहे ते आईमुळेच. त्याच्या आईला तो चांगला खेळाडू होणार अशी खात्री कायमच होती. श्रेयसच्या आयपीलमधीलही सगळ्या मॅचेसमध्ये त्याची आई हजर असतेच. त्यामुळेच श्रेयस त्याच्या आईला सपोर्ट सिस्टिम असं म्हणतो.

टॅग्स :श्रेयस अय्यरभारतआयसीसीचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५