Lokmat Sakhi >Social Viral > स्वयंपाकघरात रोज वापरतो तो कुकर किती दिवसांनी बदलणं आवश्यक, तज्ज्ञ सांगतात कुकर जुना असेल तर..

स्वयंपाकघरात रोज वापरतो तो कुकर किती दिवसांनी बदलणं आवश्यक, तज्ज्ञ सांगतात कुकर जुना असेल तर..

Old Pressure Cooker Side Effects : कदाचित हे वाचून आपल्याला धक्काही बसेल. पण आज आपण हेच पाहणार आहोत की, कामं सोपी करणारा जुना प्रेशर कुकर आपल्यासाठी कसा घातक ठरू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:34 IST2025-09-26T12:43:45+5:302025-09-26T13:34:50+5:30

Old Pressure Cooker Side Effects : कदाचित हे वाचून आपल्याला धक्काही बसेल. पण आज आपण हेच पाहणार आहोत की, कामं सोपी करणारा जुना प्रेशर कुकर आपल्यासाठी कसा घातक ठरू शकतो.

When to replace old pressure cooker doctor tells | स्वयंपाकघरात रोज वापरतो तो कुकर किती दिवसांनी बदलणं आवश्यक, तज्ज्ञ सांगतात कुकर जुना असेल तर..

स्वयंपाकघरात रोज वापरतो तो कुकर किती दिवसांनी बदलणं आवश्यक, तज्ज्ञ सांगतात कुकर जुना असेल तर..

Old Pressure Cooker Side Effects : आजकालची भरपूर धावपळ असलेली लाइफस्टाईल पाहता, आपल्या रोजच्या जीवनातील अनेक गोष्टीही बदलल्या आहेत. आता हेच पाहा की, किचनमध्ये तसाही जास्त वेळ घालवता येत नाही. अशात जास्तीत जास्त घरांमध्ये काही शिजवण्यासाठी जसे की, डाळी, बटाटे किंवा इतर काही प्रेशर कुकरचा वापर केला जातो. प्रेशर कुकरनं काम बरंच सोपं होतं. पण अनेकजण असा विचार कधीच करत नाहीत की, हाच कामं सोपं करणारा प्रेशर कुकर आरोग्यासाठी घातक शकतो. कदाचित हे वाचून आपल्याला धक्काही बसेल. पण आज आपण हेच पाहणार आहोत की, कामं सोपी करणारा जुना प्रेशर कुकर आपल्यासाठी कसा घातक ठरू शकतो.

प्रसिद्ध एक्सपर्ट डॉ. मनन वोरा सांगतात की, अ‍ॅल्यूमिनिअमच्या जुन्या कुकरमधून लीडसारखा घातक घटक जेवणात मिक्स होऊ शकतो, ज्याचे शरीरावर हळूहळू गंभीर परिणाम होऊ शकतात.

जुन्या कुकरचे धोके

वर्षानुवर्षे आपण जो कुकर वापरतो, तो जुना होतो, तेव्हा त्याच्या धातूमधून लहान मात्रेत लीड (Lead) सारखे नुकसाकारक पदार्थ त्यात शिजवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये मिक्स होतात. हे घातक तत्व हळूहळू शरीरात जमा होतात आणि सहज बाहेर पडत नाहीत. लीड रक्त, हाडे आणि मेंदूत जमा होऊन आरोग्यासंबंधी समस्या निर्माण करू शकतं.

लीडचे दुष्परिणाम

सतत थकवा जाणवतो

नसा कमजोर होतात

स्मरणशक्ती आणि मूडवर परिणाम होतो

मुलांमध्ये मेंदूची वाढ खुंटते IQ कमी होऊ शकतो

मग कधी बदलावा प्रेशर कुकर?

डॉ. वोरा सांगतात की, कुकर 10 वर्षांपेक्षा जुना झाला असेल, आतील भागावर खाचे किंवा काळे डाग दिसू लागले असतील, झाकण किंवा शिटी सैल झाली असेल, जेवणात हलका मेटॅलिक गंध किंवा चव येऊ लागली असेल तर कुकर बदलण्याची वेळ आली आहे.

छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जुना कुकर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्याचं धोक्यात टाकू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक वापर आणि वेळेत कुकर बदलला तर आरण सुरक्षित राहू शकतो.

Web Title: When to replace old pressure cooker doctor tells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.