Join us

लग्न म्हणजे काय? शिक्षकांनी निबंध लिहायला तर विद्यार्थ्याने काय लिहीले पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 14:45 IST

What is Marriage Student Wrote Essay Goes Viral : या विद्यार्थ्याला शेरा देताना इंग्रजीत Nonsense आणि मला येऊन भेट असेही निबंधाच्या खाली शिक्षकांनी लिहिले आहे.

ठळक मुद्देहा निबंध कोणत्या शहरातील, कोणत्या शाळेतील कितव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लिहीला हे माहित नाही.शिक्षकांनी या विद्यार्थ्याला शेरा देताना इंग्रजीत Nonsense आणि मला येऊन भेट असेही निबंधाच्या खाली लिहिले आहे.

शाळेत आपण प्रत्येकाने काही ना काही उचापती केलेल्या असतात. कधी वर्गात दंगा घातल्याने बाहेर शिक्षा होणे तर कधी परीक्षेच्या पेपरमध्ये उत्तरे येत नसल्याने आपल्या मनाचेच काहीतरी लिहीणे, वर्गातील शिक्षकांची टिंगल करणे असे काही ना काही आपण प्रत्येकाने केलेले असते. काही वेळा आपल्या या उचापती शाळेपुरत्याच मर्यादित राहतात तर काही वेळा त्या पालकांपर्यंत पोहोचतात. नुकतीच अशीच एक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये विद्यार्थ्याने काय करामत केली हे पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही (What is Marriage Student Wrote Essay Goes Viral).

(Image : Google)

लग्न म्हणजे काय? या विषयावर शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना निबंध लिहिण्यास सांगितले होते. एका विद्यार्थ्याने लग्नाविषयी असा काही निबंध लिहिला की, जो चर्चेचा विषय बनला आहे. मुलांना लहान वयात असलेली समज आणि त्यांची कल्पनाशक्ती याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा निबंध आहे. विद्यार्थ्याचा हा निबंध शिक्षकांना अजिबात आवडला नाही आणि त्यांनी लाल पेनाने त्याला 10 पैकी 0 गुण दिले आहेत. यासोबतच त्यांनी या विद्यार्थ्याला शेरा देताना इंग्रजीत Nonsense आणि मला येऊन भेट असेही निबंधाच्या खाली लिहिले आहे. या निबंधाचा फोटो  @srpdaa या ट्विटर युजरने शेअर केला आहे. या ट्विटला साडेअकरा हजारांहून अधिक लाईक्स आणि दीड हजार पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. बहुतेक युजर्सनी आम्ही 10 पैकी 10 मार्क दिले असते असं म्हटलं आहे. तर एका यूजरने, या मुलाला कोणीतरी पुरस्कार द्यावा, असेही म्हटले.

"लग्न तेव्हा होते जेव्हा मुलीच्या घरचे तिला सांगतात की तू आता 'मोठी' झाली आहेस, आम्ही तुला आणखी खायला घालू शकत नाही. तुझं पोट भरणारा मुलगा सापडला तर बरे होईल. आणि मग ती मुलगी एका माणसाला भेटते, ज्याचे आईवडील त्याला लग्नासाठी ओरडत असतात आणि म्हणत असतात की आता तू  मोठा झाला आहेस. दोघेही स्वतःची परीक्षा घेतात आणि आनंदी होतात. मग ते एकत्र राहायला लागतात," असं या विद्यार्थ्याने आपल्या निबंधात म्हटलं आहे. हा निबंध कोणत्या शहरातील, कोणत्या शाळेतील कितव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लिहीला याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.   

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाविद्यार्थीशिक्षक