उन्हाळ्यात चिक्कूचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण आवडीनं चिक्कू खातात. बाजारात ताजे चिक्कू दिसताच खाण्याची इच्छा होते.चिक्कू शरीरासाठी बराच फायदेशीर ठरतो. त्वचेचा टेक्सचर सुधारणं, कमकुवत हाडं किंवा इम्युनिटी सुधारणं यासाठी चिक्कू फायदेशीर ठरतो. (What Is Chiku Called In English)
चिक्कूला इंग्रजीत काय म्हणतात?
चिक्कूला इंग्रजीत काय म्हणतात असा प्रश्न अनेकांना पडतो. चिक्कूला इंग्रजीत Sapodilla सपोडीला किंवा sapota सपोटा असंही म्हणतात. या दोन्ही नावांनी हे पदार्थ ओळखले जातात.
चिक्कूचे सेवन कसे करावे?
तुम्ही सरळ चिक्कू खाऊ शकता, शेक किंवा स्मूदीसुद्धा बनवता येते, फ्रुट सॅलेड किंवा आईस्क्रीम, कस्टर्डप्रमाणे खाऊ शकता.
चिक्कू खाण्याचे ६ मोठे फायदे
चिक्कूतील फायबर्स पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे गॅसेसची समस्या कमी होते तसंच आतड्यांची साफ-सफाई होण्यासही मदतहोते. चिक्कूतील व्हिटामीन ई त्वचेला हायड्रेट ठेवते तसंच त्वचेची प्राकृतिक चमक परत येण्यास मदत होते. नियमित चिक्कू खाल्ल्यानं त्वचेशी संबंधित विकार उद्भवत नाहीत.
चिक्कूत व्हिटामीन सी, एंटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. ज्यामुळे इम्युनिटी वाढते. ज्यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. चिक्कू खाणं मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं ज्यामुळे मूड चांगला राहण्यास मदत होते.
चिक्कूतील कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्न हाडांना मजबूत ठेवते. हाडांशी संबंधित समस्या जसं की ऑस्टिओपोरोसिसपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही चिकू खाऊ शकता.
चिक्कूमध्ये फायबर्स असतात ते पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे आतड्यांची सफाई करणं सोपं होतं. चिक्कूमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम असते जे ब्लड प्रेशर कंट्रोल करते आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यासही मदत होते.
यातील नैसर्गिक शुगर आणि इतर तत्व ताण-तणाव कमी करतात आणि चांगली झोप येण्यास मदत करतात. तसंच चिक्कू खाणं मानसिक आरोग्यासाठीही उत्तम ठरतं ज्यामुळे मूड चांगला राहतो. जर तुम्ही डायटिंगवर असाल आणि तुम्हाला गोड खाण्याचं क्रेव्हींग होत असेल तर तुम्ही हे फळ कधीही खाऊ शकता.
