Join us  

घोड्यावर बसलेल्या नवऱ्याला होणाऱ्या बायकोनं छतावरून आवाज दिला; पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 3:34 PM

Wedding video viral groom : या व्हिडिओमध्ये एक वधू टेरेसवरून वराला आवाज देताना दिसत आहे.व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वधू छताच्या रेलिंगवर बसलेली दिसत आहे.

सध्या लग्नांचा मौसम सुरू आहे. सोशल मीडियावरलग्नाचे व्हिडिओज तुफान व्हायरल होत आहेत. यापैकी काही नववधूंचे व्हिडिओ  खूपच गोंडस आहेत आणि नेटिझन्सना खूप आवडले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वधू टेरेसवरून वराला आवाज देताना दिसत आहे.व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वधू छताच्या रेलिंगवर बसलेली दिसून येईल. (Wedding video viral groom was sitting on the mare bride gave a voice from the roof groom ignored)

तिने सर्व मेकअप करून आणि दागिने घातले आहेत, परंतु लेहेंग्याऐवजी तिने जीन्स घातली आहे. त्याचवेळी वरात खाली उभी असून नवरदेव घोड्यावर बसलेला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.  काही वाद्य वाजवणारेही दिसत आहेत.

किचन सिंकमध्ये चुकूनही फेकू नका ५ गोष्टी; पाईप ब्लॉक होऊन पाणी कधी तुंबेल कळणारही नाही

वधू वरून हे सर्व पाहत असते आणि मग ती वराला मोठ्यानं आवाज देते, पण कदाचित तिचा आवाज वरापर्यंत पोहोचत नाही. व्हिडिओमध्ये टेरेसवरून आपल्या वराला आवाज देणारी वधू सुंदर दिसत आहे. याला युजर्सना खूप पसंती दिली जात आहे आणि ते यावर जोरदार प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

कमाल! ऑस्ट्रेलियन तरुणीनं १० मिनिटात बनवली 'भेळपुरी'; भेळ चाखून पाहताच परिक्षक म्हणाले...

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर harshkarnawatphotography.films या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यावर आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. लोक ते खूप शेअरही करत आहेत. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरललग्न