Join us
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : वय म्हणजे फक्त एक आकडा आहे! आजींची दोरी उड्या मारण्याची पद्धत पाहून तरुणही लाजतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 11:45 IST

Viral Video : आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वृद्ध आजी असे काही करताना दिसत आहे की तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

वय हा फक्त एक आकडा आहे आणि एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर वय आड येत नाही. वय काहीही असो, काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे आणि मग तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वृद्ध आजी असे काही करताना दिसत आहे की तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. (Viral video old grandmother did such skipping gym)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक म्हातारी आजी स्किपिंग दोरी घेऊन उभी आहे. आजींचे वय 85 ते 90 च्या दरम्यान दिसते. दादीने स्कर्ट-टॉप घातला आहे आणि तिच्या पायात चप्पल आहे. त्यांच्या आजूबाजूला काही खुर्च्या, वॉशिंग मशिन काही घरगुती वस्तू दिसत आहेत. मधोमध थोडी जागा आहे आणि म्हातारी आजी दोरी घेऊन त्याच जागी उभी आहे.

 आजी दोरी उडी मारण्यास सुरुवात करतात. त्या 9-10 वेळा दोरीवर उड्या मारतात. या वयातही त्या दोरीवर इतक्या छान उडी मारतात की ते पाहून  थक्क व्हायला होतं. Discovery.engenharia या इंस्टाग्राम आयडीवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तो प्रचंड व्हायरल होत आहे.

फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे काय? या नात्यात एकमेंकाकडून अपेक्षा कसल्या असतात? समजून घ्या फायदे तोटे

यावर 4.2 हजार पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि लोक प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका यूजरने लिहिले की, "त्यांचे वय किती?" त्याचवेळी आणखी एका युजरने ‘आदर करा’ अशी कमेंट केली आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया