Lokmat Sakhi >Relationship > Is Friends With Benefits A Good Idea : फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे काय? या नात्यात एकमेंकाकडून अपेक्षा कसल्या असतात? समजून घ्या फायदे तोटे

Is Friends With Benefits A Good Idea : फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे काय? या नात्यात एकमेंकाकडून अपेक्षा कसल्या असतात? समजून घ्या फायदे तोटे

Is Friends With Benefits A Good Idea :  या प्रकारच्या नात्यात तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते. हे नाते फक्त शरीरापुरतेच ठेवा, हृदयापर्यंत घेण्याचा प्रयत्न करू नका.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 04:25 PM2022-06-03T16:25:44+5:302022-06-03T16:41:20+5:30

Is Friends With Benefits A Good Idea :  या प्रकारच्या नात्यात तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते. हे नाते फक्त शरीरापुरतेच ठेवा, हृदयापर्यंत घेण्याचा प्रयत्न करू नका.

Is Friends With Benefits A Good idea :  What is friends with benefits | Is Friends With Benefits A Good Idea : फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे काय? या नात्यात एकमेंकाकडून अपेक्षा कसल्या असतात? समजून घ्या फायदे तोटे

Is Friends With Benefits A Good Idea : फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे काय? या नात्यात एकमेंकाकडून अपेक्षा कसल्या असतात? समजून घ्या फायदे तोटे

ऑनलाइन डेटिंग असो किंवा मैत्री असो, ''फ्रेंड्स विथ बेनिफिट्स' ' ही संकल्पना खरोखरच निर्बंधांशिवाय नातेसंबंधांचा आनंद घेण्यासाठी आहे. यात कोणतीही  जबाबदारी आणि वचनबद्धता नाही. अनेकदा शारीरिक सुखाच्या देवाण घेवाणीसाठी हे नातं काहीवेळापुरताच टिकवलं जातं. (Relationship Tips) फ्रेंड्स विथ बेनिफिट्स रिलेशनशिपमध्ये, तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नसाल तरीही तुम्ही इतर कोणत्याही व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी किंवा शारीरिक संबंध ठेवण्यास बिंधास्तपणे तयार असू शकता. पण त्यात कोणत्याही प्रकारची वचनबद्धता नसते. (What is friends with benefits)

फ्रेंड्स विथ बेनिफिट्स हे असे नाते आहे, जिथे मुलगा आणि मुलगी दोघेही एकत्र राहतात आणि दोघेही जगण्याचा आनंद घेतात, एकमेंकावर प्रेम करतात, भावनांचे शेअरिंग करतात. एकमेकांकडून शारीरिक सुखाची अपेक्षा ठेवली जाते. पण लग्न आणि मुलं जन्माला घालण्याचं कोणतंही बंधन नसतं. हे नाते काही काळच टिकते. कारण यात कोणतीही जबाबदारी कोणतेही बंधन नाही. (Is Friends With Benefits A Good Idea)

फ्रेंड्स विथ बेनिफिट्स रिलेशनशिपमध्ये, तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात किंवा नाही याची पर्वा न करता, तुम्ही इतर कोणत्याही व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी किंवा शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दर्शवता. हे नाते आजकालच्या जीवनशैलीला साजेसे आहे. मैत्रीच्या नात्यानं दोन लोक लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. परंतु एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्यासाठी कोणताही दबाव नसतो. (What do friends with benefits do together)

जगात नात्याचे अनेक प्रकार आहेत आणि नात्यांबाबत अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत, पण त्यांना कोणतेही निश्चित नियम नाहीत. ज्यातून आनंद मिळतो ती गोष्ट प्रत्येकालाच करायला आवडते. फ्रेंड्स विथ बेनिफिट्सची संकल्पनाही यावरच अवलंबून आहे. ओपन रिलेशनशिप हे मुळात एक असे नाते असते, जिथे नाते संबंधातील दोन्ही व्यक्तींना शारीरिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य असते. मात्र, युरोपच्या तुलनेत भारतात ही व्याख्या बदलली आहे.

१) या प्रकारच्या नात्याची अनेक कारणे असू शकतात. काही लोकांना एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींवर प्रेम करायचे असते. काहींना सिरियस रिलेशनसोबतच कॅज्युअल सेक्सचा आनंद घेणे आवडते. काही लोकांसाठी असे रिलेशन एकटेपणाचे कारण बनते.

२) अनेक लोक फ्रेंड्स विथ बेनिफिट्स रिलेशनशिपचा सेटअप योग्य मानतात. परंतु काही लोकांसाठी ते समस्या निर्माण करतात. सुरुवातीला ऐकायला ही एक रोमांचक गोष्ट वाटू शकते, परंतु बहुतेकदा हेवा माणसाच्या मध्यभागी येतो, विशेषतः भारतात. आणि शेवटी ते कटुतेचे कारण बनते. त्यामुळे अशा रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी खोलवर विचार करणे आणि मोकळेपणाने बोलणे खूप गरजेचे आहे.

परफेक्ट 'नवरा' बनण्यासाठी माधुरीचे पती डॉ. नेनेंकडून शिका ४ गुण; सुखी संसारासाठी आवश्यक

३) लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-इओ क्लेअरने 400 प्रौढांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील मैत्रीत जर एखाद्याने आकर्षणाची भावना किंवा लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली असेल, तर त्यात पुरुष मित्राकडून पुढाकार घेण्याचे प्रमाण जास्त असते. 

फ्रेंड्स विथ बेनिफिट्स रिलेशनशिपमध्ये असताना अशी घ्या काळजी (Warnings of Friends With Benefits)

१) फ्रेंड्स विथ बेनिफिट्स रिलेशनशिप दरम्यान, तुम्ही जवळीक साधताना प्रोटेक्शनची काळजी घेतली पाहिजे. कारण अशा रिलेशनशिपमध्ये तुम्ही काही काळच एकत्र राहता. जर सेक्शुअल पार्टनरला लैगिंक संक्रमण असेल तर तुम्हालाही STD पसरण्याचा धोका असतो म्हणून प्रोटक्शनच्या वापराबाबत जागरूक राहा.

२) जर तुम्ही फ्रेंड्स विथ बेनिफिट्स रिलेशनशिपमध्ये असाल तर ते स्वतःकडे ठेवा. तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना सांगू नका. ही गोष्ट जितकी स्वत:पुरती ठेवाल तितकंच तुमच्यासाठी योग्य ठरेल.

३) या प्रकारच्या नात्यात तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते. हे नाते फक्त शरीरापुरतेच ठेवा, हृदयापर्यंत घेण्याचा प्रयत्न करू नका.

४) या प्रकारचे नाते कधीही तुटू शकते. पण आयुष्यात लाईफ पार्टनरची गरज नक्कीच असते, त्यामुळे आयुष्याचा उत्तम जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Is Friends With Benefits A Good idea :  What is friends with benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.