lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Viral Video : बोंबला! जेवताना नवरीनं पुढ्यातला भात घेतला अन् नवरदेव चांगलाच संतापला; पाहा त्यानं काय केलं

Viral Video : बोंबला! जेवताना नवरीनं पुढ्यातला भात घेतला अन् नवरदेव चांगलाच संतापला; पाहा त्यानं काय केलं

Viral Video : या व्हिडियोत नवरा नवरी सोबत कुटुंबातील लोक आजूबाजूला बसलेले दिसत आहेत. याचवेळी एक गंमत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 07:30 PM2021-12-12T19:30:18+5:302021-12-12T19:47:29+5:30

Viral Video : या व्हिडियोत नवरा नवरी सोबत कुटुंबातील लोक आजूबाजूला बसलेले दिसत आहेत. याचवेळी एक गंमत होते.

Viral Video : Viral Video of lunch ceremony of bride and groom kerala | Viral Video : बोंबला! जेवताना नवरीनं पुढ्यातला भात घेतला अन् नवरदेव चांगलाच संतापला; पाहा त्यानं काय केलं

Viral Video : बोंबला! जेवताना नवरीनं पुढ्यातला भात घेतला अन् नवरदेव चांगलाच संतापला; पाहा त्यानं काय केलं

लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला आनंदाचा आणि  अविस्मरणीय क्षण. लग्नानंतर जोडपी आयुष्यभराच्या बंधनात अडकतात आणि एकमेकांना सोबत घेऊन आयुष्य जगतात. लग्नात अशा अनेक गमतीदार घटना घडतात ज्या जोडप्यांना आयुष्यभर लक्षात राहतात. सध्या सोशल मीडियावर लग्नात जेवायला बसलेल्या एक जोडप्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Viral Video of lunch ceremony of bride and groom kerala)

हा व्हिडीओ केरळमधून समोर आल्याचं म्हटलं जात आहे. 

सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहीतीनुसार हा व्हिडियो केरळ राज्यातील असावा. हा व्हिडियो म्हणजे एका लग्नाच्या पंगतीतील प्रसंग आहे. या व्हिडियोत नवरा नवरी सोबत कुटुंबातील लोक आजूबाजूला बसलेले दिसत आहेत. याचवेळी एक गंमत होते. नवरा नवरीसाठी स्पेशल असं मोठ्ठं केळीचं पान ठेवलेलं असतं. त्यात आचारी जेवण वाढत असतात. ते भात त्या ताटात वाढतात. पण नवरी मात्र मस्करीच्यामूड मध्ये असते. ती सगळा भात आपल्या बाजूला सारून घेते. सगळे जण हसायला लागतात.

नवरा मुलगासुद्धा सुरूवातीपासून सगळ्या गोष्टी मस्करीत घेत असतो. हे वातावरण अगदी आनंदमय असतं. पण मस्करी मस्करीत अनेकांना राग अनावर होतो अशीच गंमत इथे होते. आपल्या मस्करीवर  लोक असं रिएक्ट करतील याची तिला कल्पनाही नव्हती. समोर आलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती नवऱ्या मुलाला  टोमणा  मारते. मग काय, शेवटी जे व्हायचं ते होतं.

काही सेकंदात सगळे गप्प बसतात. हे सगळं इतकं अचानक घडतं की  नक्की काय झालंय हे कोणाच्या लक्षात येत नाही. सगळं मजेत चाललेलं असताना हा प्रकार अनपेक्षित असतो. पण त्याचमुळे हा व्हिडियो नंतर ही लक्षात राहतो. आपण जर हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला नक्की प्रकार काय घडलाय हे लक्षात येईल. 
 

Web Title: Viral Video : Viral Video of lunch ceremony of bride and groom kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.