Lokmat Sakhi >Social Viral > धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?

धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?

एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे जो पाहून लोकांना मोठा धक्का बसला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:34 IST2025-09-16T16:34:14+5:302025-09-16T16:34:53+5:30

एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे जो पाहून लोकांना मोठा धक्का बसला. 

viral video shows raw banana ripened in just one minute using chemicals | धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?

धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे दररोज व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे जो पाहून लोकांना मोठा धक्का बसला. व्हिडिओमध्ये एक माणूस तोंडाला पांढरा रुमाल बांधून बसलेला दिसत आहे. त्याच्या समोर एक बादली ठेवली आहे, ज्यामध्ये तो हिरव्या रंगाची कच्ची केळ टाकतो. आणि काही सेकंदांनी ती बाहेर काढतो. तेव्हा केळी पिवळी झालेली दिसतात. हा व्हिडीओ पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. 

"एका मिनिटात केळी पिकली, आजकाल आपण विष खात आहोत" असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर कच्ची केळी केमिकल्समध्ये टाकून पिकवली जातात यावर लोकांचा विश्वास बसला आहे. त्यामुळेच ही केळी शरीरासाठी विषापेक्षा कमी नाहीत. म्हणूनच लोकांना नेहमी नैसर्गिकरित्या पिकवलेली फळं खाण्याचा सल्ला दिला जातो.


b_pahadi_vlogs_uk03 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहींनी हे खरं असल्याचं समजून चिंता व्यक्त केली, तर अनेकांनी हा व्हिडीओ एडिट केलेला असल्याचं सांगत आणि मध्येच केळी बदलण्यात आली आहेत असं म्हटलं. मात्र खरोखरच जर असं घडत असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे.

व्हिडिओमध्ये असलेल्या व्यक्तीने एक धक्कादायक दावाही केला. तो म्हणाला, "ही आमची चूक नाही, मालक आम्हाला हे काम करायला लावतात." या विधानामुळे लोकांना सत्य काय आहे याचा अधिक विचार करायला भाग पाडलं. हा व्हिडीओ एडिट केलेला आहे की खरा आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की, लोकांनी नैसर्गिकरित्या पिकवलेली फळं खावीत. केमिकल्सनी पिकवलेली फळं शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकतात.
 

Web Title: viral video shows raw banana ripened in just one minute using chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.