Join us

बार्गेनिंग करायला आवडतं म्हणून रशियन तरुणी चक्क रस्त्यावर उभं राहून....- बघा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2024 13:36 IST

Viral Video Of Russian Women Selling Vegetables: भारतीयांची बार्गेनिंग करण्याची स्टाईल भलतीच आवडली म्हणून बघा ही रशियन तरुणी काय करते आहे....

ठळक मुद्देपरदेशी तरुणी चक्क भाजी विकायला उभी आहे म्हटल्यावर अनेकांनी गरज नसतानाही भरपूर कांदे- बटाटे खरेदी केले.

परदेशातून आलेल्या लोकांना आपल्याकडच्या अनेक गोष्टी पाहून नाविन्य वाटतं, कुतूहल वाटतं. त्यामुळे मग ते हौशीने आपल्याकडच्या त्यांना आवडलेल्या गोष्टी करून बघतात. आपल्याकडे येऊन त्यांनी काहीही केलं तरी त्यांचं कौतूकच होतं. या रशियन तरुणीचंही तसंच झालं. तिला म्हणे भारतीय लोकांची कोणतीही गोष्ट खरेदी करताना असणारी बार्गेनिंग करण्याची सवय खूपच आवडते. त्यामुळे तिला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा होता. त्यासाठी तिने चक्क एक भाजीवाला गाठला आणि त्याच्या शेजारी राहून मोठ्याने ओरडून भाज्या विकल्या. भाज्या विकताना ग्राहकांशी भावावरुन घासाघीस करताना तिला अतिशय मजा आली असंही ती सांगतेय. तिची ती भाज्या विकण्याची स्टाईल खरोखरच पाहण्यासारखी आहे. (Viral video of Russian women selling vegetables in local market of Goa)

 

 भारतीय वेशभुषा करून, कपाळावर छानशी टिकली लावून ती एका कांदे- बटाटे विकणाऱ्या तरुणाच्या शेजारी जाऊन उभी राहील आणि थेट त्याच्यासारखंच ओरडून भाज्या विकायला लागली.

साडी नेसली पण पदर जास्तच लांब झाला? १ झकास आयडिया- निऱ्या न सोडताही पदर होईल लहान

हा अतिशय मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. mariechug या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मारिया चुगुरोवा असं या तरुणीचं नाव असून ती सध्या गोव्यामध्ये आहे. तिच्या पोस्टमध्ये ती लिहिते आहे की तिला भारतीय बाजारपेठा आणि त्यांच्यामध्ये असलेला गोंगाट, कलकलाट खूप आवडतो. 

 

त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी ती एक भाजीविक्रेत्याकडे गेली आणि त्याला भाजी विकणं शिकव असं सांगितलं. त्याच्याकडे कांदे आणि बटाटे होते.  त्यामुळे त्याने तिला वेलकम चित्रपटातला नाना पाटेकरचा आलू लेलाे, कांदा लेलो हा प्रसिद्ध डायलाॅग शिकवला.

बॉलीवूड अभिनेत्रींसारखं स्टायलिश ब्लाऊज शिवायचंय? मग या लेटेस्ट फॅशनच्या बाह्यांचे प्रकार पाहून घ्या...

त्यानुसार तिने तो डायलॉग अतिशय मजेशीर पद्धतीने म्हणत कांदे- बटाटे विकले. विकताना ग्राहकांसोबत भरपूर घासाघीसदेखील केली. परदेशी तरुणी चक्क भाजी विकायला उभी आहे म्हटल्यावर अनेकांनी गरज नसतानाही भरपूर कांदे- बटाटे खरेदी केले. ग्राहकांनी खूप भाव केला पण मी बार्गेनिंग मास्टर आहे. त्यामुळे मला ज्या भावात पाहिजेत, त्या भावातच मी भाज्या विकल्या असंही ती पोस्टमध्ये म्हणते आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाभाज्याबाजार