lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > साडी नेसली पण पदर जास्तच लांब झाला? १ झकास आयडिया- निऱ्या न सोडताही पदर होईल लहान

साडी नेसली पण पदर जास्तच लांब झाला? १ झकास आयडिया- निऱ्या न सोडताही पदर होईल लहान

Saree Hack If The Pallu Is Little Long: सगळी साडी नेसून झाल्यावर पदर जरा जास्तच लांब झाला आहे हे लक्षात आलं तर काय करायचं ते पाहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2024 09:18 AM2024-03-09T09:18:27+5:302024-03-09T09:20:01+5:30

Saree Hack If The Pallu Is Little Long: सगळी साडी नेसून झाल्यावर पदर जरा जास्तच लांब झाला आहे हे लक्षात आलं तर काय करायचं ते पाहा....

Saree hack if the pallu is little long, how to adjust long saree pallu perfectly without disturbing saree | साडी नेसली पण पदर जास्तच लांब झाला? १ झकास आयडिया- निऱ्या न सोडताही पदर होईल लहान

साडी नेसली पण पदर जास्तच लांब झाला? १ झकास आयडिया- निऱ्या न सोडताही पदर होईल लहान

Highlightsपुन्हा सगळ्या निऱ्या सोडून पदर ॲडजस्ट करणं हे बरंच वेळखाऊ आणि किचकट होऊन जातं. म्हणूनच ही ट्रिक...

साडी नेसणं हेच अनेकजणींसाठी अवघड आणि वेळखाऊ काम असतं. त्यामुळे कुठेही बाहेर जाताना साडी नेसायची झाली तर त्यांना तयार व्हायला अर्धा पाऊण तास जरा जास्तच लागतो. कारण साडी व्यवस्थित पिनअप करून नेसणं हा त्यांच्यासाठी अवघड टास्क असतो (Saree hack if the pallu is little long). त्यात जर संपूर्ण साडी नेसून झाल्यावर, निऱ्यांना पिनअप करून त्या व्यवस्थित चापून चोपून बसवल्यानंतर असं लक्षात आलं की साडीचा पदर जरा जास्तच मोठा किंवा लांब झाला आहे, तर मग सगळं ब्रह्मांड आठवतं. (how to adjust long saree pallu perfectly without disturbing saree)

 

कारण पुन्हा सगळ्या निऱ्या सोडून पदर ॲडजस्ट करणं हे बरंच वेळखाऊ आणि किचकट होऊन जातं. म्हणूनच संपूर्ण पिनअप केलेल्या निऱ्या न सोडताही साडीचा पदर व्यवस्थित ॲडजस्ट करून बरोबर मापाचा कसा करायचा, याची एक ट्रिक पाहून घ्या.

अक्षयकुमारची 'ही' चांगली सवय आपल्याला लागली तर तब्येतीच्या अर्ध्या तक्रारी जातील- वाचा नेमकं काय...

ही ट्रिक अतिशय मस्त आहे. कारण यामुळे तुमचा पदरच फक्त लहान होणार नाही तर साडीचा लूक बदलायलाही नक्कीच मदत होईल. साडीचा पदर मोठा झाला नसेल तरीही तुम्ही ही ट्रिक कधी करून पाहा. या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पदर घेतल्याने नक्कीच अधिक स्टायलिश- आकर्षक दिसाल. 

 

साडीचा पदर लांब झाला तर काय करावे?

साडीचा पदर लांब झाला तर करावं, याविषयीचा एक छोटासा व्हिडिओ tikhiimli_official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

यामध्ये जर तुमचा पदर थोडा लांब झाला तर तो जिथे खांद्यावर पिनअप करता त्या ठिकाणी थोडा हातात पकडा आणि जेवढा लांब झाला आहे, तेवढा दुमडून घ्या.

भरीताचं वांगं आतून किडलेलं आहे हे कसं ओळखायचं? वांग्याची खरेदी करताना लक्षात ठेवा १ खास ट्रिक

पदर दुमडून घेतल्यावर त्याला एक रबरबॅण्ड लावा. आता साडीच्या त्या भागातल्या छोट्या छोट्या प्लेट्स छान पसरवून घ्या. त्याला गोलाकार दिला तर त्या छान फुलासारख्या दिसतील. 

आता हे फुल बरोबर तुमच्या खांद्यावर घ्या आणि तिथे पदर पिनअप करा. यामुळे खांद्यावर छान पदराची स्टाईल केल्यासारखं दिसेल आणि तुमचा लूकही बदलेल. 
 

Web Title: Saree hack if the pallu is little long, how to adjust long saree pallu perfectly without disturbing saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.