lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Viral Video : कमालच केली! लाडू विकण्यासाठी पठ्ठ्यानं वापरली अनोखी पद्धत; व्हिडीओ पाहून  IPS अधिकारी म्हणाले... 

Viral Video : कमालच केली! लाडू विकण्यासाठी पठ्ठ्यानं वापरली अनोखी पद्धत; व्हिडीओ पाहून  IPS अधिकारी म्हणाले... 

Viral Video : लाडू विकताना तो अतिशय मस्त शैलीत गाणं म्हणतोय. त्याचं गाणं ऐकून सगळ्यांनाच लाडू खाण्याची इच्छा होईल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 04:08 PM2022-01-16T16:08:35+5:302022-01-16T16:13:13+5:30

Viral Video : लाडू विकताना तो अतिशय मस्त शैलीत गाणं म्हणतोय. त्याचं गाणं ऐकून सगळ्यांनाच लाडू खाण्याची इच्छा होईल. 

Viral Video : IPS officer shares a amazing video of laddu seller who sings while sell laddu | Viral Video : कमालच केली! लाडू विकण्यासाठी पठ्ठ्यानं वापरली अनोखी पद्धत; व्हिडीओ पाहून  IPS अधिकारी म्हणाले... 

Viral Video : कमालच केली! लाडू विकण्यासाठी पठ्ठ्यानं वापरली अनोखी पद्धत; व्हिडीओ पाहून  IPS अधिकारी म्हणाले... 

भारतात एकपेक्षा एक कलाकार आपल्या कलाकृतीनं आणि सादरीकरणानं नेहमीच नेटिझन्सचं मन जिंकून घेत असतात. आपल्या जवळंच सामान विक्री करण्यासाठी विक्रेते खासकरून रस्त्यावर विक्री करणारे लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

व्हिडीओत आपण पाहू शकता लाडू विक्रेता लाडू विकण्यासाठी अनोख्या पद्धतीचा वापर करत आहे. लाडू विकत असलेल्या या व्यक्तीचं नाव कल्लू केवट असून तो मूळचा मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातला आहे. लाडू विकताना तो अतिशय मस्त शैलीत गाणं म्हणतोय. त्याचं गाणं ऐकून सगळ्यांनाच लाडू खाण्याची इच्छा होईल. 

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला असून यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की आमच्या देशात महान कलाकार आहेत. गाणं ऐकून लाडू खावेसे वाटले. तर नितीन शर्मा यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मध्य प्रदेशातल्या कल्लू केवटची लाडू विकण्याची अनोखी पद्धत असं  लिहिलंय.

डान्सिंग केळेवाला

काही दिवसांपूर्वी पुण्यातील डान्सिंग केळीवाला चर्चेत आला होता. नोकरी गेल्यामुळे त्यानं पैसे कमावण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवली.  डान्सिंग स्टाईलने केळी विक्रीच्या पद्धतीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.   विक्रेते नामदेव माने यांनी दिघी परिसरातील आळंदी- पुणे रस्त्यावर केळी विकण्यास सुरूवात केली. ग्राहकांच लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी नाचत नाचत केळी २० रु डझन… केळी ३० डझन असे म्हणून त्यांनी ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली.
 

Web Title: Viral Video : IPS officer shares a amazing video of laddu seller who sings while sell laddu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.