>सोशल वायरल > डोळ्यावर पट्टी बांधून चराचर चिरल्या भाज्या, झरझर केलं चाउमीन..वाह रे बहाद्दर-पाहा व्हिडिओ

डोळ्यावर पट्टी बांधून चराचर चिरल्या भाज्या, झरझर केलं चाउमीन..वाह रे बहाद्दर-पाहा व्हिडिओ

Trending video: इथे आंधळी कोशिंबीर खेळायची म्हटलं की दमछाक होते... तिथे हा अवलिया पहा.. चक्क डोळ्यावर पट्टी बांधून भाज्या सरसर चिरतो काय आणि भन्नाट नुडल्स बनवतो काय.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 05:07 PM2022-01-21T17:07:06+5:302022-01-21T17:08:10+5:30

Trending video: इथे आंधळी कोशिंबीर खेळायची म्हटलं की दमछाक होते... तिथे हा अवलिया पहा.. चक्क डोळ्यावर पट्टी बांधून भाज्या सरसर चिरतो काय आणि भन्नाट नुडल्स बनवतो काय.. 

Viral video: Blindfolded man chopping vegetables and doing noodles perfectly  | डोळ्यावर पट्टी बांधून चराचर चिरल्या भाज्या, झरझर केलं चाउमीन..वाह रे बहाद्दर-पाहा व्हिडिओ

डोळ्यावर पट्टी बांधून चराचर चिरल्या भाज्या, झरझर केलं चाउमीन..वाह रे बहाद्दर-पाहा व्हिडिओ

Next
Highlightsत्याने भाज्या कापण्यापासून ते नुडल्स डिशमध्ये सर्व्ह करण्यापर्यंत सर्वकाही डोळ्यांवर पट्टी बांधून केले आहे...

डोळ्यांवर साधा चष्मा नसेल तर अनेक जणांना काही सुचत नाही.. त्यात जर एखाद्या स्त्री ला रेग्युलर चष्मा लावायची सवय असेल, तर चष्मा न लावता तिला तिच्याच स्वयंपाक घरात सुरळीतपणे कामही  करता येत नाही.. पण इथे तर या अवलिया माणसाने कहरच केला आहे.. डोळ्यांवर पट्टी बांधून त्याने स्वयंपाकात असा काही अतरंगी प्रयोग केला आहे की तो पाहूनच अनेक नेटकरी (social viral) मंडळींची झोप उडाली आहे..

 

तर त्याचं झालं असं की सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल झाला आहे. nagpur_buzz या इन्स्टाग्राम (instagram) पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इंदोरच्या साई कृपा या चायनिज सेंटरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये चायनिज विक्रेता भाज्या कापताना आणि नुडल्स करताना दिसतो आहे.... एवढंच नाही, तर त्याने भाज्या कापण्यापासून ते नुडल्स डिशमध्ये सर्व्ह करण्यापर्यंत सर्वकाही डोळ्यांवर पट्टी बांधून केले आहे...

 

सगळ्यात आधी तर तो विक्रेता डोळ्यांवर पट्टी बांधून कोबी चिरताना दिसताे आहे.. डोळे बंद असतानाही कोबी चिरण्याची त्याची स्पीड अफलातून आहे. बायकांचे पाकशास्त्रात वर्चस्व असते, असे आपल्याकडे मानले जाते.. त्यामुळे एखादी सुगरण महिला आणि हा माणूस अशी स्पर्धा जर घेतलीच तर डोळे उघडे ठेवूनही या माणसाप्रमाणे सुबक आणि जलद भाजी चिरणे एखाद्या सुगरणीला शक्य होणार नाही.. त्याचे भाजी चिरण्याचे कसब खरोखरंच लाजवाब आहे.

 

भाजी चिरल्यानंतर त्याने डोळ्यांवर पट्टी बांधूनच तापलेल्या कढईत तेल, नूडल्स, वेगवेगळे सॉस, मीठ आणि मसाले टाकले... एवढंच नाही तर अतिशय सरसपणे नूडल्स ताटात सर्व्ह देखील केल्या.. डोळ्यांवर पट्टी असूनही त्याने केलेलया नूडल्समध्ये मीठ, मसाले, सॉस यांचे प्रमाण अचूक झाले असून नूडल्स खरोखरच खूप टेस्टी झाल्याचे नूडल्स चाखणाऱ्यांनी कमेंटमध्ये टाकले आहे. 
 

Web Title: Viral video: Blindfolded man chopping vegetables and doing noodles perfectly 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Odour From Bag: ऑफिसची पर्स, स्कुल बॅग, टिफिन बॅगमधला कुबट वास जाता जात नाही? ५ उपाय, बॅग नव्या-स्वच्छ - Marathi News | Home Hacks: How to remove odour from tiffin bag, purses and other bags, 5 simple tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिसची पर्स, स्कुल बॅग, टिफिन बॅगमधला कुबट वास जाता जात नाही? ५ उपाय, बॅग नव्या-स्वच्छ

Easy ways to remove unpleasant odour: टिफिन बॅग, पर्स, जीमची बॅग, किंवा मग प्रवासाहून आल्यानंतर रिकामी झालेली बॅग.. यांच्यामधला कुबट वास जाता जात नाही.. म्हणूनच तर या बघा त्यासाठी काही ट्रिक्स. ...

Ketaki Chitale Latest News : सतत वादग्रस्त विधानं करणारी केतकी चितळे आहे कोण? आजवर काय काय बोलली.. - Marathi News | Ketaki Chitale Latest News : Who is Ketaki Chitale arrested for posting derogatory remarks against Sharad Pawar | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सतत वादग्रस्त विधानं करणारी केतकी चितळे आहे कोण? आजवर काय काय बोलली...

Ketaki Chitale Latest News : केतकी चर्चेचा विषय ठरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही आपल्या वादग्रस्त विधांनामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे ती वादात सापडली होती. ...

Mango Maggi Viral Video : मॅगीची पार वाट लावली! तव्यावर देशी स्टाईलनं बनवली 'मँगो मॅगी'; पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Mango Maggie Viral Video : God find me another planet mango maggi horrifies internet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मॅगीची पार वाट लावली! तव्यावर देशी स्टाईलनं बनवली 'मँगो मॅगी'; पाहा व्हायरल व्हिडिओ

Mango Maggie Viral Video : फंटा मॅगी, मॅगी आईस्क्रीम असे अनेक प्रयोग इंस्टंट न्यूडल्स बनवताना केला जातात. मॅगी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच लोकप्रिय आहे. ...

Tutti Frutti Recipe: मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर  - Marathi News | Food And Recipe: How to make tutti frutti from water melon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर 

Tutti Frutti Recipe: आईस्क्रिम, केक यामध्ये दिसणारी आणि जवळपास सगळ्याच लहान मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी घरच्याघरी करणं अगदीच सोपं आहे.. बघा ही खास रेसिपी ...

आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही - Marathi News | Worried about weight gain and heat problem by eating mango? 7 special tips, weight and heat both will get controlled | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही

Proper Method of Eating Mango: दररोज आंबा खाऊनही वजन (weight) आणि शरीरातील उष्णता (heat) दोन्हीही कंट्रोलमध्ये राहू शकतं... त्यासाठीच या काही खास टिप्स ...

How to clean door mat: कळकट्ट घाणेरडी पायपुसणी घरात आणतात आजार, ५ गोष्टी करा- पायपुसणी चकाचक- स्वच्छ - Marathi News | How to clean door mat properly? Correct method of cleaning door mat  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कळकट्ट घाणेरडी पायपुसणी घरात आणतात आजार, ५ गोष्टी करा- पायपुसणी चकाचक- स्वच्छ

Cleaning Door Mat: बऱ्याचदा घरातले पायपुसणे इतके वेगवेगळ्या प्रकारचे असतात, की त्यांची स्वच्छता नेमकी कशी करावी,  याचा अंदाजच येत नाही. म्हणूनच या काही खास टिप्स.  ...