lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अरे देवा! लाईटबील वाचवण्यासाठी बाईनं केला कुकरचा जुगाड; व्हायरल व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल..

अरे देवा! लाईटबील वाचवण्यासाठी बाईनं केला कुकरचा जुगाड; व्हायरल व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल..

Girl Irons Clothes With Pressure Cooker Viral Video : बचत करण्यासाठी महिला काहीही करू शकतात याचं उदाहरण या व्हिडिओतून दिसून येतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 05:03 PM2024-03-15T17:03:57+5:302024-03-15T17:33:21+5:30

Girl Irons Clothes With Pressure Cooker Viral Video : बचत करण्यासाठी महिला काहीही करू शकतात याचं उदाहरण या व्हिडिओतून दिसून येतं.

Viral Jugad Viral Video : Girl Irons Clothes With Pressure Cooker Video Is Going Viral | अरे देवा! लाईटबील वाचवण्यासाठी बाईनं केला कुकरचा जुगाड; व्हायरल व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल..

अरे देवा! लाईटबील वाचवण्यासाठी बाईनं केला कुकरचा जुगाड; व्हायरल व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल..

भारतातल्या घरात किंवा ऑफिसात एखादी वस्तू नसेल किंवा काहीही प्रोब्लेम असेल तरी काम अडून राहत नाही. काहीना काही जुगाड करून लोक काम पूर्ण करतात.  (Trending Tips) जुगाडांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. घरात मोफत विज वापरणं असो किंवा वीजबील वाचवण्यासाठी आपलं डोकं लावणं असो लोक प्रत्येकवेळी आपलं डोकं चालवतात काही घटना तर  इतक्या विनोदी असतात की ते पाहिल्यानंतर तुम्ही आपले हसू रोखू शकणार नाही. (Girl Irons Clothes With Pressure Cooker Viral Video)

असाच एक व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल  होत आहे. बचत करण्यासाठी महिला काहीही करू शकतात याचं उदाहरण या व्हिडिओतून दिसून येतं. कपडे प्रेस करण्यासाठी पैसे जाऊ नये किंवा विजेचे बील जास्त येऊ नये यासाठी महिलेने हा युनिक जुगाड केला आहे. (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये  किचनमध्ये एक महिला  उभी आहे. तिने इलेक्ट्रानिक स्टोव्हववर कुकर ठेवला आहे. या कुकरमध्ये ती काहीतरी शिजवत आहे असा भास होतो किंवा शिट्टी वाजण्याची वाट पाहत आहे. किचनमध्ये कुकरची शिट्टी वाजल्यानंतर ती लगचेच स्टोव्ह बंद करते आणि कुकर उचलून खोलीत घेऊन जाते. बेडवर शर्ट ठेवून ती कुकरच्या साहाय्याने इस्त्री करत असते. मुलीचा हा जुगाड पाहून सगळेचजण अवाक् झाले आहेत. 

वजन कमी करण्याासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत पाहा; वजन घटेल-पोटही साफ राहील

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर @coolfunnytshirt  नावाने शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वीज वाचवा, पर्यावरण वाचवा असं लिहिण्यात आलं आहे. ही न्यूज  लिहून होईपर्यंत या व्हिडिओला २ लाख ९२ हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की मी प्रेशर कुकरचा असा क्रिएटिव्ह वापर पाहिलेलाच नव्हता.  अजून एका युजरने कमेंट केली आहे की ती, 'स्त्री आहे ती काहीही करू शकते. ' या व्हिडिओवर विनोदी कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Web Title: Viral Jugad Viral Video : Girl Irons Clothes With Pressure Cooker Video Is Going Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.