इन्स्टाग्रामवर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे काही दिवसांत ट्रेंड बनतात आणि लोक वेड्यासारखं त्याचं अनुकरण करू लागतात. सध्या असंच काहीसं एका 'फूड चॅलेंज'बाबत घडत आहे, ज्याला 'रॉक-पेपर-सिझर फूड चॅलेंज' असं म्हटलं जातं. हा ट्रेंड इतका लोकप्रिय झाला आहे की, इन्स्टाग्रामवर दर दुसरा व्हिडीओ याच चॅलेंजवर बनलेला दिसत आहे. हे नक्की काय आहे आणि ते कशा प्रकारे जीवघेणे ठरू शकतं हे जाणून घेऊया...
काय आहे रॉक-पेपर-सिझर फूड चॅलेंज?
रॉक-पेपर-सिझर फूड चॅलेंज हे एक अत्यंत लोकप्रिय फूड चॅलेंज आहे, ज्यामध्ये आवडीचे खाद्यपदार्थ जिंकण्यासाठी स्पर्धक 'रॉक-पेपर-सिझर' हा खेळ खेळतात. याचे नियम असे आहेत की, एका प्लेटमध्ये सर्वजण आपापल्या आवडीचे पदार्थ ठेवतात. खेळ सुरू झाला की, जो जिंकतो त्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अन्न खायचं असतं, तर हरणाऱ्या व्यक्तीला धावत जाऊन एक फेरी मारून परत यावं लागतं. या दरम्यान विजेता हवं तितकं अन्न खाऊ शकतो.
फूड चॅलेंजचे तोटे
अति वेगाने खाणं - कमी वेळात जास्त अन्न खाण्याच्या घाईत लोक अन्न चावत नाहीत तर थेट गिळतात, ज्यामुळे पोटाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
पोटदुखी आणि अपचन - वेगाने खाल्ल्यामुळे अन्न नीट चावलं जात नाही, परिणामी गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
घशात अडकण्याची भीती - घाईघाईने खाताना अन्नाचा घास घशात अडकण्याचा मोठा धोका असतो, जो जीवघेणा ठरू शकतो.
जास्त कॅलरीज - गरजेपेक्षा जास्त आणि वेगाने खाल्ल्यामुळे शरीरात जास्त कॅलरीज जातात, ज्यामुळे वजन वाढण्याची भीती असते.
जास्त खाणं - गंमत म्हणून वारंवार असे चॅलेंज खेळल्यामुळे खाण्याच्या चुकीच्या सवयी लागू शकतात. जसं की भूक नसतानाही खाणं किंवा प्रमाणाबाहेर खाणं.
Web Summary : The 'Rock-Paper-Scissors Food Challenge' is trending, but dangerously encourages rapid eating. This can cause indigestion, choking, and weight gain. Play safely, or avoid it entirely.
Web Summary : 'रॉक-पेपर-सिज़र्स फ़ूड चैलेंज' ट्रेंड कर रहा है, पर यह खतरनाक ढंग से तेज़ी से खाने को बढ़ावा देता है। इससे अपच, दम घुटना और वज़न बढ़ सकता है। सुरक्षित खेलें या पूरी तरह से बचें।