Lokmat Sakhi >Social Viral > नॉनस्टिक पॅनमध्ये स्टीलच्या चमच्याचा वापर करता? आरोग्याचं होईल मोठं नुकसान...

नॉनस्टिक पॅनमध्ये स्टीलच्या चमच्याचा वापर करता? आरोग्याचं होईल मोठं नुकसान...

Non Stick Safety Tips: जर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये काही बनवत असताना स्टीलच्या चमच्याचा वापर करत असाल तर ही चूक तुम्ही आजारी पडण्याचं कारण ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:30 IST2025-06-12T14:29:58+5:302025-06-12T14:30:30+5:30

Non Stick Safety Tips: जर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये काही बनवत असताना स्टीलच्या चमच्याचा वापर करत असाल तर ही चूक तुम्ही आजारी पडण्याचं कारण ठरू शकते.

Useing steel spoon in non-stick pan should be harmful for health | नॉनस्टिक पॅनमध्ये स्टीलच्या चमच्याचा वापर करता? आरोग्याचं होईल मोठं नुकसान...

नॉनस्टिक पॅनमध्ये स्टीलच्या चमच्याचा वापर करता? आरोग्याचं होईल मोठं नुकसान...

Non Stick Safety Tips: किचनमध्ये स्वयंपाकासाठी किंवा इतरही वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या भांड्यांचा वापर केला जातो. आजकालच्या मॉडर्न लाइफस्टाईलमुळे बाजारात नॉनस्टिर कुकवेअर भरपूर मिळतात. नॉनस्टिक भांड्यांचा वापर करण्याचा ट्रेण्ड अलिकडे खूप वाढला आहे. कारण या भांड्यांमध्ये काही बनवण्यासाठी तेल कमी लागतं आणि वेळही वाचतो. तसेच याला पदार्थ जास्त चिकटत नसल्यानं धुण्यासही सोपे असतात. पण इतके फायदे असूनही नॉनस्टिक भांडी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. जर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये काही बनवत असताना स्टीलच्या चमच्याचा वापर करत असाल तर ही चूक तुम्ही आजारी पडण्याचं कारण ठरू शकते.

नॉनस्टिक पॅनच्या तळाला टेफ्लॉन नावाचं कोटिंग असतं, जे ज्यामुळे पदार्थ याला चिकटत नाहीत. हे कोटिंग एकप्रकारचा रासायनिक पदार्थ आहे ज्याला पॉलीटेट्राफ्लोरोएथिलीन (PTFE) म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही हे कोटिंग स्टील किंवा एखाद्या दुसऱ्या धारदार चमच्या घासता, तेव्हा ते हळूहळू निघू लागतं. बऱ्याच जणांना स्वयंपाक करताना भांड्यात जोरजोरात चमचा फिरवण्याची किंवा आपटण्याची सवय असते. असं करणं महागात पडू शकतं.

स्टीलच्या चमच्यानं निघतं कोटिंग

स्टीलच्या चमच्यामुळे नॉनस्टिकमधील कोटिंग खरडलं जातं. ज्यामुळे कोटिंग निघतं आणि ते अन्नात मिक्स होतं. हे कोटिंग शरीरात जाऊन हळूहळू विषारी प्रभाव करतं. ज्यामुळे लिव्हर डॅमेज, हार्मोनल असंतुलन आणि पुढे जाऊन कॅन्सरचा धोकाही होऊ शकतो.

नॉनस्टिकला गरम करणंही घातक

जर तुम्ही रिकामं नॉनस्टिक पॅन मोठ्या आसेवर गरम करत असाल तर यातून निघणारा गॅसही विषारी असू शकतो. खासकरून जेव्हा पॅनचं कोटिंग खरडलं गेलं असेल तेव्हा हा धोका अधिक राहतो.

काय काळजी घ्याल

नॉनस्टिक पॅनमध्ये नेहमीच लाकडाच्या किंवा सिलिकॉनच्या चमच्याचा वापर करा.

मोठ्या आसेवर रिकामं पॅन ठेवू नका

कोटिंग निघालेलं दिसत असेल तर पॅन लगेच बदला

किचनमधील छोट्या छोट्या सवयी अनेकदा मोठ्या समस्यांचं मूळ ठरतात. स्टीलच्या चमच्यानं नॉनस्टिक पॅनमधील कोटिंग निघणं कॉमन आहे. पण यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर योग्य भांड्यांचा वापर केला गेला पाहिजे.
 

Web Title: Useing steel spoon in non-stick pan should be harmful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.