Lokmat Sakhi >Social Viral > एक दिवस सुटी पुरत नाही, मग अडीच दिवस घ्या!  मजा, लॉंग वीक ऑफ देणाऱ्या देशात

एक दिवस सुटी पुरत नाही, मग अडीच दिवस घ्या!  मजा, लॉंग वीक ऑफ देणाऱ्या देशात

Four and half day week: खरंच असं होईल का? साडेचार दिवसांचा आठवडा आणि अडीच दिवसांचा विकएण्ड? हो खरंच असं झालं आहे. हे स्वप्न नाही तर आता या देशातल्या एम्प्लॉइजसाठी (employees) वास्तव असणार आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 07:06 PM2021-12-09T19:06:23+5:302021-12-09T19:07:47+5:30

Four and half day week: खरंच असं होईल का? साडेचार दिवसांचा आठवडा आणि अडीच दिवसांचा विकएण्ड? हो खरंच असं झालं आहे. हे स्वप्न नाही तर आता या देशातल्या एम्प्लॉइजसाठी (employees) वास्तव असणार आहे..

Two and half day weekly off in UAE, New year's gift to employees | एक दिवस सुटी पुरत नाही, मग अडीच दिवस घ्या!  मजा, लॉंग वीक ऑफ देणाऱ्या देशात

एक दिवस सुटी पुरत नाही, मग अडीच दिवस घ्या!  मजा, लॉंग वीक ऑफ देणाऱ्या देशात

Highlightsशुक्रवारी दुपारी १२ वाजेपासूनच कर्मचारी त्यांचा विकेंड एन्जॉय करायला मोकळे असणार आहेत. 

सोमवार ते गुरुवार (monday to thursday) फुल्ल काम करा आणि त्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासूनच तुम्ही तुमचा मोठ्ठा विकेंड (long weekend in Dubai) एन्जॉय करायला मोकळे... असं झालं तरी किती भारी ना असा विचार प्रत्येक एम्प्लॉईच्या मनात आणि त्यातही खास करून प्रत्येक वर्किंग वुमनच्या (working women) मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. स्पेशली वर्किंग वुमनच्या बाबतीत बोलायचं झालं तर आठवडाभर काम करून काही जणी इतक्या थकून जातात की त्यानंतर मिळणाऱ्या दोन दिवसांच्या सुट्ट्याही पुरत नाहीत. कारण त्या सुट्ट्यांमध्येच त्यांना घरातलं सगळं नियोजन करायचं असतं... संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये राहणाऱ्या वर्किंग वुमन आता मात्र या कचाट्यातून सुटल्या  असून शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासूनच त्या त्यांचा विकेंड (Four and half day week for employees in UAE) एन्जॉय करायला मोकळ्या असणार आहेत. 

 

संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE सरकारने तेथील कर्मचाऱ्यांना नववर्षासाठी एक भन्नाट गिफ्ट (gift for new year) दिलं आहे... त्यामुळे तिथले कर्मचारी आता एक नाही, दोन नाही तर तब्बल अडीच दिवस त्यांचा विकएण्ड साजरा करणार आहेत. दोन दिवसांपुर्वी युएई सरकारने याविषयीची घोषणा केली असून त्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहात या निर्णयाचे स्वागत केले. आता अडीच दिवसांची सुटी म्हणजे उरलेले साडेचार दिवस तिथल्या कर्मचाऱ्यांना अतिशय शिस्तीत आणि जलद काम करावे लागणार हे नक्की. पण अडीच दिवसांची सुट्टी मिळाली तर उरलेले साडेचार दिवस आम्ही दुप्पट मेहनत घेऊन काम करू, अशी तयारी तेथील कर्मचाऱ्यांनी दाखवली आहे. 

 

आतापर्यंत UAE मध्ये शुक्रवार आणि शनिवार हे विकएण्ड असायचे. रविवारी तिथे नेहमीप्रमाणे सगळे काही सुरू असायचे. आता या नविन नियमानुसार मात्र रविवारी तेथील सर्व कार्यालये बंद असतील. खाजगी कर्मचाऱ्यांच्या विक ऑफ त्या- त्या कंपनीने घेतलेल्या निर्णयावर अवलंंबून असेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. शनिवारी आणि रविवारी शटडाऊन असलेल्या देशांशी आर्थिक व्यवहार, व्यापार सुरळीत व्हावा, या उद्देशाने हा बदल करण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. 

 

Web Title: Two and half day weekly off in UAE, New year's gift to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.