Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > डोअरला उभं राहून हात बाहेर काढणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

डोअरला उभं राहून हात बाहेर काढणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

Train Accident : या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता,  एक तरुणी ट्रेनच्या  दरवाज्याजवळ उभं राहून प्रवास करत असताना हात बाहेर काढते. तेवढ्यात वेगाने ट्रेन येते आणि त्या मुलीचा तोल जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 15:01 IST2022-06-21T14:16:37+5:302022-06-21T15:01:11+5:30

Train Accident : या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता,  एक तरुणी ट्रेनच्या  दरवाज्याजवळ उभं राहून प्रवास करत असताना हात बाहेर काढते. तेवढ्यात वेगाने ट्रेन येते आणि त्या मुलीचा तोल जातो.

Train Accident : Trending train accident saved girl viral video dangerous life threatening incident | डोअरला उभं राहून हात बाहेर काढणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

डोअरला उभं राहून हात बाहेर काढणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

मुंबई लोकल मध्ये रोज हजारो लोकं प्रवास करतात. तासानतास प्रवास करून, प्रचंड गर्दीतून जीव मुठीत धरून  कामाचं ठिकाण गाठतात. ट्रेन मध्ये दरवाज्याजवळ उभं राहिल्यावर प्रसन्न वाटत असलं छान हवा येत असली तरी  कधी  कधी हे जीवावर बेतू शकत. सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. (Trending train accident saved girl viral video dangerous life threatening incident)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता,  एक तरुणी ट्रेनच्या  दरवाज्याजवळ उभं राहून प्रवास करत असताना हात बाहेर काढते. तेवढ्यात वेगाने ट्रेन येते आणि त्या मुलीचा तोल जातो.  ट्रेन मधले इतर लोक त्या मुलीला हात देऊन तिचा जीव वाचवतात. ही तरुणी अक्षरशः ट्रेनच्या खाली पडलेली असते अशा स्थितीत ट्रेन मधले इतर लोक हात देऊन तिला वर काढतात. सुदैवाने या तरुणीला कोणतीही दुखापत होत नाही.  कालपासून हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या निमित्ताने ट्रेन ने जाताना स्वतःच्या जीवाची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे हा संदेश दिला जात आहे.

हा व्हिडिओ सुरू असताना अचानक असे काही घडते की या चित्रपटातील दृश्याचे रुपांतर  अपघातात होते. या मुलीचा पाय घसरतो आणि त्याचवेळी समोरून दुसरी ट्रेनही येते. त्यामुळे मुलीचा जीव वाचणार नाही अशी भिती वाटते. संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी फेसबुकवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा.

https://www.facebook.com/reel/1061926811419632


मुलगी दोन्ही गाड्यांच्या मधोमध लटकली होती.  मात्र मुलीचे नशीब चांगले असल्याने तिचा जीव थोडक्यात बचावला. दुसरी ट्रेन निघताच त्या व्यक्तीने मुलीला ओढत ट्रेनच्या आत नेले.  अनेक लोक असा निष्काळजीपणा करतात किंवा त्यांना असे करणे मजेदार वाटते. क्षणभर मौजमजेसाठी जीव धोक्यात घालणे शहाणपणाचे की मूर्खपणाचे हे तुम्हीच निवडावे?

Web Title: Train Accident : Trending train accident saved girl viral video dangerous life threatening incident