Bathroom Bucket and mug Cleaning Tips : पाण्यात वाढलेले क्षार आणि नियमितपणे स्वच्छता न केल्यानं बाथरूममधील बकेट, मग किंवा स्टूलवर चिव्वट काळे-पिवळे डाग जमा होतात. यामुळे ते घाणेरडे तर दिसतातच, सोबतच आरोग्यासाठी सुद्धा नुकसानकारक असतात. या भांड्यांवरील पिवळे चिकट डाग काढण्यासाठी अनेक उपाय केले जातात, पण डाग काही केल्या निघत नाहीत. अशात आज आम्ही तुम्हाला या भांड्यांवरील काळे-पिवळे डाग दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.
लिंबाच्या रसानं दूर होतील डाग
लिंबामध्ये अॅसिडिक अॅसिड असतं, ज्यामुळे पाण्याचे डाग सहजपणे दूर होण्यास मदत मिळते. अशात बाथरूम बकेट किंवा प्लास्टिकच्या वस्तू चमकवण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबाचा रस या वस्तूंवर ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर पाण्यानं आणि ब्रशनं डाग दूर करा. लिंबाच्या रसात तुम्ही बेकिंग सोडा मिक्स करूनही या प्लास्टिकच्या भांड्यांवर लावू शकता. यानंही फायदा मिळतो.
ब्लीचिंग पावडर वापरा
बाथरूमधील बकेट आणि मगाचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही ब्लीचिंग वापडरचा वापर करू शकता. ब्लीच पाण्यात भिजवून या वस्तूंवर काही वेळासाठी लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने या वस्तू धुवून घ्या.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
प्लास्टिकची बकेट आणि मगवरील चिकट पिवळे, काळे डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिक्स करून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट बकेट आणि मगावरील डागांवर लावून काही वेळ ठेवा. त्यानंतर या गोष्टी पाण्यानं घासून स्वच्छ करा.
हायड्रोजन पॅरॉक्साइड
बाथरूममधील प्लास्टिकच्या वस्तू क्लीन करण्यासाठी हायड्रोजन पॅरोक्साइड एक चांगला पर्याय आहे. यानं या वस्तूंवरील डाग आणि चिकटपणा दूर होण्यास मदत मिळते. एका स्प्रे बॉटलमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइड आणि पानी समान प्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण डाग असलेल्या वस्तूंवर स्प्रे करा. १० ते १५ मिनिटे ते तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवून घ्या.