आरोग्यासाठीफळे खाणे फार फायद्याचे असते. मात्र फक्त फळे खाणेच नाही तर फळांची सालं वापरणेही फायद्याचे असते. फार आवडीने खाल्ली जाणारी फळे म्हणजे संत्र-मोसंबी. (Throwing away orange peels is a big mistake! Use them in 6 ways - your home will be happier and your health will also improve.)त्यांची सालं फेकून देण्याऐवजी ती अनेक उपयोगी आणि पर्यावरणपूरक मार्गांनी वापरता येतात. या सालांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स, सुगंधी तेल आणि नैसर्गिक अॅसिड असतात. जे विविध कारणांसाठी वापरता येतात.
१. स्वयंपाकघरासाठी - साल किसून (झेस्ट) केक, पेस्ट्री, लोणचं किंवा सॅलड ड्रेसिंग मध्ये वापरता येतात. सालं भिजवून घ्यायची आणि साखरेत शिजवून त्याची मस्त कँण्डी तयार करता येते. चवीला मस्त लागते.
२. नैसर्गिक क्लीनर - मोसंबी साल आणि व्हिनेगर मिसळून घरगुती क्लीनर तयार करता येते. ते किचन, सिंक तसेच लादी, ओटा साऱ्यासाठीच प्रभावी असे लिक्विड आहे. सालातील अॅसिड आणि सुगंधी तेलं डाग कमी करतात आणि हवाही शुद्ध करतात.
३. कंपोस्ट आणि मलर - सालं सुकवून कंपोस्टमध्ये घालायची. थोडी काळ्या मातीत मिक्स करायची.असे केल्यास ते मातीचा पोत सुधारण्यात मदत करतात. कुंडीत लावलेली झाडे छान वाढावीत यासाठी या सालांचा खत म्हणून वापर करता येतो. नैसर्गिक खत कधीही चांगलेच. त्याचा काही तोटा नाही.
४. एअरफ्रेशनर - या सालांचे मस्त एअरफ्रेशनर तयार करता येते. विकतच्या एअरफ्रेशनरमध्ये अल्कोहोल तसेच काही रसायने असतात जी आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकतात. त्यामुळे असे एअरफ्रेशनर वापरण्याऐवजी घरीच मंत्री-मोसंबीची सालं वाळवायची. त्यात आवळा, लवंग, सुगंधी फुले असे सारे घालून मस्त पूड करायची. ती पाण्यात मिक्स करुन वापरायची.
५. स्किनकेअर- किसलेली साल हलक्या हाताने फेस स्क्रब म्हणून वापरता येतील. त्वचा संवेदनशील असल्यास वापरु नका. केसांसाठी घरीच शिकेकाई उकळताना त्यात ही सालं घालता येतात. मस्त उकळून घ्यायची. केसांसाठी फायद्याची असतात. तसेच त्वचेसाठीही त्याची पेस्ट फायद्याची ठरते.
६. कीटकनाशक- कपाटावर तसेच शेल्फजवळ संत्र्याची सालं ठेवणे फायद्याचे ठरते. त्याच्या वासाने कीटक तसेच माश्या आणि इतरही किडे लांब राहतात. पाण्यात मिसळून त्याचा वापर काचा पुसण्यासाठी करा. म्हणजे किडे घराकडे फिरकणारच नाहीत.