काम आणि मातृत्व यांचा समतोल साधणे ही अनेक महिलांसाठी मोठी कसरत असते. विशेषतः आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना घर, मुलं आणि करिअर यांचा ताळमेळ साधण्यासाठी अतिरिक्त मदतीची गरज भासते. (The salary of the nani is 46000, the video of the woman from Bengaluru goes viral)अलीकडेच परवीन चॉधरी या बेंगळुरुमधील महिलेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे याच विषयावर मोठी चर्चा रंगली. या व्हिडिओमध्ये तिने स्पष्टपणे सांगितले की ती तिच्या दोन लहान मुलांच्या संगोपनासाठी दोन नॅनी ठेवते ज्याला आया किंवा हेल्प असंही म्हटलं जातं आणि त्यासाठी ती दरमहा सुमारे ४६,००० रुपये खर्च करते. तिच्या मते, ही केवळ सेवा नाही तर तिच्या कुटुंबासाठी आधारव्यवस्था आहे. तिची पहिली नॅनी दररोज जवळपास ११ तास काम करते. ती मुलांची देखभाल करते, त्यांना खाऊ घालते, त्यांच्यासोबत खेळते, तसेच घरातील काही कामांतही मदत करते. या नॅनीला ती दरमहा सुमारे ३२,००० रुपये देते. दुसरी नॅनी १४,००० रुपयांवर काम करते आणि मुख्य नॅनीला सुट्टी असताना किंवा अतिरिक्त मदतीची गरज असताना साथ देते.
या खर्चाचा उल्लेख करताना तिने स्पष्ट केले की तिच्यासाठी ही गुंतवणूक आहे. ती म्हणाली की, "मी त्यांना कर्मचारी म्हणून पाहत नाही, त्या माझ्या मुलांसाठी दोन ‘लव्हिंग आंट्स’ आहेत." विश्वास आणि सातत्य ही मुलांच्या संगोपनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच ती नॅनींवर पूर्ण विश्वास ठेवते आणि सतत निरीक्षण ठेवत नाही.
तिने व्हिडिओमध्ये हेही सांगितले की या मदतीमुळे तिला कामावर लक्ष केंद्रित करता येते, प्रवास करता येतो आणि ऑफिसमधील जबाबदाऱ्या शांतपणे पार पाडता येतात परवीन म्हणते, "मी आई म्हणून दोषी वाटून न घेता माझं काम करू शकते, कारण मला माहित आहे की माझी मुलं सुरक्षित आणि प्रेमळ हातात आहेत."
तिच्या मुलांबद्दल बोलताना ती भावूक झाली. ती म्हणाली की मुलं या नॅनींशी मनाने जोडली गेली आहेत. त्यांना त्या कुटुंबातील सदस्यांसारख्याच वाटतात. मुलं त्यांच्यासोबत हसतात, खेळतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात. त्यामुळे घरात एक आनंदी आणि सुरक्षित वातावरण तयार झाले आहे. मुलांना स्थिर आणि प्रेमळ काळजी मिळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे, आई ऑफिसमध्ये असो किंवा घरी.
या व्हिडिओ नंतर सोशल मिडियावर मात्र दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. काहींनी ज्यांना परवडतं त्यांना बिनधास्त खर्च करावा. जर पैसे आहेत तर मदतीला माणसं ठेवण्यात काहीही चूक नाही. तर काहींच्या मते एवढा खर्च करुन मुलांना आईची माया कळत नाही. कमवलेले सगळे पगारावरच जात असेल तर काय फायदा. मात्र खरे पाहाल तर आजकाल अनेक जण हाऊस हेल्प ठेवतात. आई झाल्यावर वैयक्तिक आयुष्य संपत नाही असे ही अनेकांनी म्हटले.
Web Summary : A Bengaluru woman's video about paying her nannies ₹46,000 sparked debate on work-life balance. She emphasizes the importance of reliable childcare, viewing her nannies as family and enabling her career without guilt. Reactions varied, some supported her choice, while others questioned the cost and impact on maternal bonds.
Web Summary : एक बेंगलुरु की महिला का अपनी नैनी को ₹46,000 वेतन देने का वीडियो कार्य-जीवन संतुलन पर बहस का कारण बना। उन्होंने भरोसेमंद चाइल्डकैअर के महत्व पर जोर दिया, अपनी नैनी को परिवार मानती हैं और बिना अपराधबोध के अपने करियर को आगे बढ़ाती हैं। प्रतिक्रियाएँ अलग-अलग थीं, कुछ ने उनके विकल्प का समर्थन किया, जबकि अन्य ने लागत और मातृ बंधन पर प्रभाव पर सवाल उठाया।