lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > एक असं बेट जिथे कानाकोपऱ्यात लटकत आहेत 'डेड डॉल्स'. पाहा झाडाला लटकणाऱ्या बाहुल्यांची रहस्मय वस्ती..

एक असं बेट जिथे कानाकोपऱ्यात लटकत आहेत 'डेड डॉल्स'. पाहा झाडाला लटकणाऱ्या बाहुल्यांची रहस्मय वस्ती..

The Island of the Dolls Has a Murky and Terrifying History : असं बेट जिथे आहे 'डेड डॉल्स'चं साम्राज्य, तिथे जाताच माणसांचा होतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 05:30 PM2023-11-21T17:30:05+5:302023-11-21T17:38:18+5:30

The Island of the Dolls Has a Murky and Terrifying History : असं बेट जिथे आहे 'डेड डॉल्स'चं साम्राज्य, तिथे जाताच माणसांचा होतो...

The Island of the Dolls Has a Murky and Terrifying History | एक असं बेट जिथे कानाकोपऱ्यात लटकत आहेत 'डेड डॉल्स'. पाहा झाडाला लटकणाऱ्या बाहुल्यांची रहस्मय वस्ती..

एक असं बेट जिथे कानाकोपऱ्यात लटकत आहेत 'डेड डॉल्स'. पाहा झाडाला लटकणाऱ्या बाहुल्यांची रहस्मय वस्ती..

जगात असे अनेक आश्चर्यकारक स्थळं आहेत, जिथे जाताच विश्वास बसणार नाही, असे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहतात. पृथ्वीच्या काना-कोपऱ्यात अनेकदा अचंबित करणाऱ्या, अविश्वसनीय घटना घडत असतात. आपल्या जगात ७ वंडर्स ऑफ द वर्ल्ड प्रचलित आहे. त्याचप्रमाणे इतरही काही स्थळे आहेत, जे त्यांच्या वैशिष्ट्यांसाठी फेमस आहे.

शिवाय असेही काही जागा आहेत, जे पाहताच क्षणी लोकांचा थरकाप उडतो, आणि त्यापैकी एक म्हणजे "ला इस्ला डे ला म्युनेकस". ही जागा मेक्सिकोपासून (Mexico) १७ किलोमीटर अंतरावर आहे. या बेटावर मृत बाहुल्यांचा साम्राज्य असल्याचे सांगण्यात येते. पण या ठिकाणी भयावह बाहुल्या आलेत कुठून? असं काय रहस्य दडलंय त्या बेटावर, ज्यामुळे ट्युरिस्ट या ठिकाणी रात्रीच्या वेळेस थांबायला टाळतात. या बेटामागचं रहस्मय गूढ काय? पाहा(The Island of the Dolls Has a Murky and Terrifying History).

'डेड डॉल्स'चं साम्राज्य असणारं बेट

"ला इस्ला डे ला म्युनेकस" हे बेट खरंतर भयावह-लटकणाऱ्या बाहुल्यांसाठी प्रचलित आहे. पण या बेटावर बाहुल्या आल्या कुठून? त्यामागे देखील एक रहस्यमय कथा दडली आहे.  बाहुल्या कोणाला नाही आवडत. लहान मुलं बाहुल्यांना पाहून त्यांच्याकडे धाव घेतात. मात्र या ठिकाणी हजारो बाहुल्या असूनही, तेथे लहान मुलं तर सोडाच मोठी माणसं ही जाण्यास घाबरतात.

वाढत्या वजनामुळे करणार होती आत्महत्या, आज ठरली पहिली प्लस साईज मिस युनिव्हर्स, पाहा तिचा जिद्दीचा प्रवास

कारण या ठिकाणी झाडासह इतर ठिकाणी भयावह स्थितीत बाहुल्या लटकलेले आपल्याला पाहायला मिळतील. तेथील काही बाहुल्यांचे शीर, तर काही बाहुल्यांचे हात-पाय मोडलेले आहेत. दिवसा त्यांच्या डोळ्यांची भुभूळं ही हलतात. तेथील स्थानिक नागरिकांनुसार, रात्र होताच तेथे लहान मुलीचा रडण्याचा-हसण्याचा आवाजही येतो.

काय आहे या डेड डॉल्समागील सत्य?

शासकीय कागदपत्रांवर हे बेट भुताटकी असल्याचा उल्लेख नाही.  मात्र, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या बाहुल्यांमध्ये एका लहान मुलीची आत्मा असल्याचं सांगण्यात येते. या बेटाची कहाणी खूप भयानक आहे. १९५० सालची ही गोष्ट, ‘ला इस्ला डे ला म्युनेकस’ या आयलँन्डवर दुसऱ्या बेटावरून एक माणूस नियमित फिरायला येत असत.

डॉन जूलियन सँटाना बरेरा त्या माणसाचे नाव असून, तो दिवसभरचा आपला उद्योग उरकल्यावर फिरायला येत असे. तसं त्यावेळी या बेटावर कोणीही राहत नसे, हाच त्या बेटाचा मालक होता. एके दिवशी त्या ठिकाणी एक जोडपं आपल्या मुलीसह फिरायला आले होते. ती चिमुरडी आपल्या पाल्यांची नजर चुकवत पाण्याजवळ गेली, व त्याच पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला.

काही दिवसानंतर त्या मुलीचा मृतदेह पाण्यात तरंगत वर येतो, व तिच्यासोबत ज्युलियनला एक बाहुली सापडते. तो ती बाहुली जवळ असलेल्या झाडावर लटकवतो. असे करत त्याला हजारो बाहुल्या पाण्याजवळ सापडतात. तो सरळ ती बाहुली उचलतो आणि झाडांवर लटकवत जातो. त्याला अधून मधून बाहुल्यांच्या रडण्य़ाचा- हसण्याचा आवाज आला असं म्हटलं जातं. त्यानंतर एके दिवशी त्या बेटावर लोकल चँनेलचा एक फिल्म मेकर पोहचला. पाहताक्षणी त्याचे डोळे फिरले, तो ही हे दृश्य पाहून अचंबित झाला. त्यानंतर त्याने शूट करून या सगळ्या गोष्टी प्रसारमाध्यमांना शेअर केलं. त्यानंतर या बेटामुळे प्रसारमाध्यमांमध्ये एकच खळबळ माजली.

मोहम्मद शमीवर बेताल आरोप करणारी हसीन जहाँ कोण? तिची शमीवर एवढी खुन्नस का आहे?

त्यानंतर आणखी एका घटनेनं सर्वजण हादरून गेले होते. २००१ साली ज्या ठिकाणी लहान मुलीचा मृतदेह आढळतो, त्याच ठिकाणी ज्युलियनचा मृत्यू झाल्याचे तेथील स्थानिक नागरिक सांगतात. असं म्हणतात आजही या बेटावर त्या ठिकाणी बाहुली सापडते, ती परत कोणीतरी झाडावर लटकवतं.

Web Title: The Island of the Dolls Has a Murky and Terrifying History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.