Join us

बाळाला कडेवर घेऊन वर्गात तास घेणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल, याला जिद्द म्हणावे की मजबुरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 14:01 IST

Social Viral: आईची जबाबदारी आणि शिक्षिकेची कर्तव्ये एकाचवेळी पार पाडणाऱ्या या शिक्षिकेचा व्हिडिओ (viral video of a teacher) सध्या साेशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे...

ठळक मुद्देआई आणि शिक्षिका या दोन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी पार पाडणाऱ्या एका शिक्षिकेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूपच चर्चेत आहे. 

नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही वर्किंग वुमनला (working women) घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना प्रत्येक दिवशी तारेवरची कसरत करावी लागते. घरातली कामं, मुलांची दुखणीखुपणी, ज्येष्ठांचं आजारपण, पाहुणे असं सगळं सांभाळत नोकरीतही आपली जागा टिकवून ठेवणं, याला कमालीचं कौशल्य लागतं.. अशीच जिद्द दाखवून आई आणि शिक्षिका (duties of mother and a teacher) या दोन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी पार पाडणाऱ्या एका शिक्षिकेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूपच चर्चेत आहे. 

 

बऱ्याचदा नोकरदार महिलांना असा अनुभव येतो की घरी मुलं आईला कामावर जाऊ नको म्हणून हट्ट करत असतात. पण त्याच दिवशी ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात काहीतरी महत्वाचं कामअसतं. मग अशावेळी रडणाऱ्या चिमुकल्यांना तसंच सोडून आईला ऑफिस गाठावं लागतं.. व्हिडिओमधल्या या शिक्षिकेलाही बहुदा तसाच अनुभव आला असावा. त्यामुळे तिने तिच्या तान्ह्या बाळाला घेतलं आणि थेट वर्ग गाठला. मुलाला कडेवर घेऊन ती इतर विद्यार्थ्यांना शिकवत आहे. 

 

हा व्हिडिओ @AnkitaP11821586 या ट्विटर हॅण्डलवरून (twitter) शेअर करण्यात आला आहे. एकीकडे काही जणं आई आणि शिक्षिका या दोन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी पार पाडणाऱ्या या महिलेचं कौतूक करत आहेत, तर त्याचवेळी काहीजण असंही म्हणत आहेत की आपण जर त्या शिक्षिकेच्या वर्गात असलो असतो, तर बाळामुळे निश्चितच डिस्ट्रॅक्ट झालो असतो. बाळाला कडेवर घेऊन शिकवणं, यामुळे विद्यार्थी एकाग्र होऊन शिकू शकणार नाहीत, असंही काही जणांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाट्विटरशिक्षक