शाळेत शिकणं म्हणजे फक्त अभ्यास आणि परीक्षा असाच अनेकांचा समज असतो. पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अभ्यासाव्यतिरिक्त आनंद देण्यासाठी अनेक उपक्रम महत्त्वाचे ठरतात. आतापर्यंत अनेक शिक्षकांनी या विचारातून विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या पारंपरिक पद्धती बाजूला सारल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये शिक्षिकेने याच विचारातून विद्यार्थ्यांसोबत मिळून 'देस रंगीला' या देशभक्तीपर गाण्यावर केलेला डान्स चर्चेचा विषय बनला आहे. (Teacher Energetic Dance on des rangila with students in classroom wins heart internet)
इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाने केलेला हा डान्स त्यांच्यातील उत्साह आणि चैतन्य दाखवणारा आहे. शिक्षकाचा हा उत्साह पाहून विद्यार्थीही तेवढ्याच उत्साहात डान्स करताना दिसतात. स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील तयारीचा हा व्हिडिओ असावा. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या डान्सला अधिक प्रोत्साहन दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास नक्कीच मदत झाली असेल.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या शिक्षकांचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना पुन्हा एकदा शिक्षकाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शिक्षकाची नेमकी काय भूमिका असते, याचे महत्त्व लक्षात आले आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थी एका वर्गात 'देस रंगीला' गाण्यावर एकत्र डान्स करताना दिसत आहेत.
शिक्षकाचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असून त्या अगदी मनापासून या डान्सचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासोबत डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत आहे, आणि ते देखील तालावर नाचत आहेत. हे दृश्य पाहताना असे वाटते की, हे फक्त डान्सचे प्रशिक्षण नसून एक आनंदी आणि मैत्रीपूर्ण वातावरण आहे, जिथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक खास बंध तयार होत आहे.
शाळा केवळ ज्ञानाचे केंद्र नसून ती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. असे उपक्रम विद्यार्थ्यांमधील दडलेली कला बाहेर काढायला मदत करतात. शिवाय, हे उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आनंद मिळवून देतात, ज्यामुळे त्यांना शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी अधिक आपुलकी वाटते. शिक्षकांचे असे मैत्रीपूर्ण आणि प्रेरणादायी वागणे विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक रस घ्यायला प्रोत्साहन देते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत अशा प्रकारे सामील होणे हे आधुनिक शिक्षण पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे.
पोट खूपच सुटलंय? चपाती बनेल फॅट कटर; कणकेत 'हा' पदार्थ मिसळून करा-भराभर घटेल चरबी
हा व्हिडिओ पाहून अनेकजण शिक्षिकाचे कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 'हे शिक्षक केवळ डान्स शिकवत नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना रुजवत आहे.' तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, 'असे शिक्षकच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात.' हे सर्व कमेंट्स पाहिल्यावर लक्षात येते की, शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून त्यात विद्यार्थ्यांच्या भावनात्मक आणि कलात्मक वाढीचा समावेश असणे किती महत्त्वाचे आहे.