सोशल मिडियावर वाईटसाईट तर आपण पाहतोच, पण बरेचदा असे काही व्हिडिओ दिसतात जे मन भारावून टाकतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहीत करतात. असाच एक भावनिक आणि अभिमानाने भरलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.(Taxi driver's daughter becomes CBI officer, social viral video ) साधा, कष्टकरी असा एक ड्रायव्हर, त्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण पॅसेंजरला अभिमानाने सांगताना कॅपचर झाला आणि शेअर झाल्यावर लोकांनीही चालकाचे कौतुक केले. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळंच सांगून जातो, गाडी चालवताना तो अचानक कॅमेऱ्याकडे वळतो आणि जे बोलतो, ते ऐकून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल.
मुलगी नको , मुलगा हवा हे विचार आजही ऐकायला मिळतात. अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या वर्गात आजही या विचाराला उत्तेजन मिळतं. अशातच मी नाही शिकलो पण माझी मुलगी मोठी अधिकारी आहे. असं अभिमानाने सांगणाऱ्या बापाची ही गोष्ट आहे. लखनऊमध्ये टॅक्सी चालवणारे उपेंद्र गुप्ता आता IAS अधिकारी आणि CBI अधिकारीचे वडील आहेत. दोन मुली आहेत आणि दोघींनाही शिकवून मोठ्या पदावर नेण्यासाठी त्यांनी खुप कष्ट घेतलेच असतील यात काहीच वाद नाही. स्वतःच्या मुलींबद्दल बोलताना उपेंद्र अगदी अभिमानी आणि आनंदी होते.
उपेंद्र सांगतात, माझी मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली आता तुम्ही एका CBI अधिकार्याचे वडील झाले आहात. ही बातमी ऐकून उपेंद्र खुप खुष झाले. मुख्य म्हणजे कोणतेही कोचिंग क्लास न लावता स्वतःहून अभ्यास करुन परीक्षा पास होत त्यांच्या मुलीने यश मिळवले. मुलींचे यश त्यांचा आनंद याशिवाय आईवडिलांना काहीच नको असतं असं सांगताना उपेंद्र भावुक झाले. माझी मुलगी आता भारत सरकारसाठी काम करेल असं म्हणताना त्यांच्या आवाजात अभिमान होता.
हा व्हिडिओ इतका व्हायरल होण्यामागचं कारण फक्त यश नाही, तर त्या यशामागचा प्रवास आहे. एका सामान्य कुटुंबातील वडिलांनी आपल्या मुलीसाठी केलेले कष्ट, त्याग आणि शिक्षणासाठी दिलेली साथ याची ही जिवंत साक्ष आहे. दिवस-रात्र मेहनत करून मुलीला मोठं करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकजण भावुक झाले. 'खऱ्या अर्थाने यश म्हणजे हेच,' 'आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं यापेक्षा मोठं काही नाही,' अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत. काही जणांनी तर हा व्हिडिओ पाहून आपल्या पालकांची आठवण काढली.
Web Summary : A Lucknow taxi driver's joy went viral after sharing his daughter's CBI officer achievement. Overcoming financial constraints, he proudly narrates how his daughter, without coaching, achieved success, fulfilling his dreams. The video highlights parental sacrifices and the immense pride in a daughter's accomplishment.
Web Summary : लखनऊ के एक टैक्सी ड्राइवर की खुशी वायरल हो गई जब उन्होंने अपनी बेटी की सीबीआई अधिकारी बनने की उपलब्धि साझा की। आर्थिक बाधाओं को पार करते हुए, वे गर्व से बताते हैं कि कैसे उनकी बेटी ने बिना कोचिंग के सफलता प्राप्त की, जिससे उनके सपने साकार हुए। वीडियो माता-पिता के बलिदानों और बेटी की उपलब्धि पर अपार गर्व को उजागर करता है।