Taiwanese Influencer Sudden Death: जगभरातील ब्युटी प्रोडक्ट्सचा अनोख्या पद्धतीनं रिव्ह्यू करणारी तायवानची इन्फ्लुएन्सर गुआवा शुईशुईचं अचानक निधन झालं. ती 24 वर्षाची होती आणि ती ब्यूटी प्रोडक्ट्स स्किनवर लावण्यासोबतच ते चाखूनही बघत होती. शुईशुईला सोशल मीडियावर Guava Beauty नावानं सुद्धा ओळखलं जात होतं. शुईशुईचं वय कमीच होतं, त्यामुळे अचानक तिचा मृत्यू होणं धक्कादायक आहे.
ब्रिटिश वेबसाईट इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार, इन्फ्लुएन्सर गुआवा शुईशुईचं निधन अचानक झालेल्या आजारामुळे झालं आहे. पण त्याबाबत माहिती दिली गेली नाही. ती अनेक व्हिडिओमध्ये मेकअपचे प्रोडक्ट्स चेहऱ्यावर लावल्यानंतर ते खाऊन त्यांची टेस्टही सांगत होती. एका व्हिडिओत शुईशुईनं एक जेली ब्लड लावलं आणि नंतर चमच्यानं खाल्लं. या व्हिडिओत तिनं सांगितलं होतं की, हे प्रोडक्ट खाण्यासाठी नाही.
शुईशुईच्या अनेक व्हिडिओमुळे तिच्यावर टिकाही झाली. अनेकांनी तिच्या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केला होता की, जर चुकून कुणी हे मान्य केलं की, हे प्रोडक्ट खाण्या योग्य आहे आणि त्यामुळे नुकसान झालं तर काय ती जबाबदारी घेईल? शुईशुई तिच्या प्रत्येक व्हिडिओत हे प्रोडक्ट खाण्यासाठी नाहीत असं सांगते. काही लोकांचं मत आहे की, तिचा मृत्यू हार्ट अॅटॅकमुळे झाला असेल तर काही लोकांना असं वाटतं की, तिचा मृत्यू ब्यूटी प्रोडक्ट्स खाऊन फूड पॉयजनिंगमुळे झाला असेल. तर शुईशुई एका जवळच्या मैत्रिणीनं एका पोस्टमध्ये सांगितलं की, मेडिकल टीमनं हे स्पष्ट केलंय की, गुआवाच्या मृत्यूसोबत ब्यूटी प्रोडक्ट खाण्याचा काहीच संबंध नाही.
पण प्रश्न हा आहे की, ब्यूटी प्रोडक्ट खाल्ल्यानं मृत्यू होऊ शकतो का? काही एक्सपर्ट सांगतात की, ब्यूटी प्रोडक्ट खाल्ल्यानं लोकांचा जीव जाऊ शकतो. हे प्रोडक्ट स्किनवर बाहेरून लावण्यासाठी बनवलेले असतात. यातील केमिकल्स पॅराबिन, फॉर्मलडिहाइड, आर्टिफिशियल फ्रेगरेंस, प्रिजर्वेटिव्स आणि कलरिंग एजेंट्स शरीरात जाऊन विषारी तत्व बनवू शकतात. जर नेहमीच हे खाल्ले तर उलटी, चक्कर येणे, पोटात वेदना, लिव्हर किंवा किडनी डॅमेज आणि हार्ट फेलिअर सारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.
हेल्थ एक्सपर्टनुसार, ब्यूटी प्रोडक्ट्स एक किंवा दोनदा चाखणं जीवघेणं ठरत नाही. पण याची सवय घातक ठरू शकते. जर एखाद्या लहान मुलानं किंवा व्यक्तीनं जास्त प्रमाणात ब्यूटी प्रोडक्ट खाल्लं तर जीव जाऊ शकतो. त्यामुळेच ब्यूटी प्रोडक्ट्सवर इशारा दिलेला असतो की, हे केवळ बाहेरील वापरासाठी आहेत.