Lokmat Sakhi >Social Viral > सुनीता विलियम्स यांनी अंतराळात फुलवली बाग, स्पेस स्टेशनवर केली भाजीची लागवड - पाहा त्याची सुंदर झलक

सुनीता विलियम्स यांनी अंतराळात फुलवली बाग, स्पेस स्टेशनवर केली भाजीची लागवड - पाहा त्याची सुंदर झलक

Sunita Williams planted a garden in space : अंतराळात अडकल्यावरही काम करत राहीले अंतराळवीर. पाहा सुनीता विलियम्स यांनी अंतराळात ९ महिने काय केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2025 13:43 IST2025-03-11T13:40:47+5:302025-03-11T13:43:18+5:30

Sunita Williams planted a garden in space : अंतराळात अडकल्यावरही काम करत राहीले अंतराळवीर. पाहा सुनीता विलियम्स यांनी अंतराळात ९ महिने काय केले.

Sunita Williams planted a garden in space | सुनीता विलियम्स यांनी अंतराळात फुलवली बाग, स्पेस स्टेशनवर केली भाजीची लागवड - पाहा त्याची सुंदर झलक

सुनीता विलियम्स यांनी अंतराळात फुलवली बाग, स्पेस स्टेशनवर केली भाजीची लागवड - पाहा त्याची सुंदर झलक

सुनीता विलियम्स व बुच विल्मोर ही अंतराळ वीरांची जोडी नासा तर्फे स्पेस स्टेशनला गेली आहे. ५ जून २०२३ ला ते दोघे अंतराळात गेले. (Sunita Williams planted a garden in space)त्यानंतर अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. त्यांना स्ट्रँण्डेड अंतराळवीर असेही संबोधले गेले. स्ट्रँण्डेड अंतराळवीर म्हणजे अंतराळात अडकलेले. काही तांत्रिक अडचणी आल्याने त्यांना परत पृथ्वीवर आणणे शक्य नाही असे अंतराळवीर. (Sunita Williams planted a garden in space)मात्र १६ मार्च २०२५ ला ते दोघेही पुन्हा पृथ्वीवर येतील, असे नासाने सांगितले आहे. त्यांच्या जागी दुसरे अंतराळवीर पाठवले जातील. 

 जेव्हा जगभरातील लोक ते अंतराळातून पुन्हा येणार की नाही अशा चिंतेत होते, तेव्हा ५९ वर्षीय भारतीय अंतराळवीर सुनीता मात्र अंतराळात विविध प्रयोग करून बघत होत्या. (Sunita Williams planted a garden in space)त्यांना अंतराळात कंटाळा येत नाही कारण त्या स्वत:ला विविध कामांमध्ये व्यस्त ठेवतात असे टाइम्स नाऊ , यु.एस न्यूज अशा  विविध माध्यमांमार्फत सांगितले गेले.          

सुनीता विलियम्स यांनी अंतराळात भाज्यांचे पीक घेण्याचा प्रयोग केला. अंतराळातही लागवड करता येते. लेट्यूस या वनस्पतीचे निरिक्षण केले. त्यांनी हा प्रयोग अंतराळात असताना वीरांना ताजे अन्न मिळावे म्हणून केला आहे. या प्रयोगाला प्लांट हॅबिटॅट-०७ असे नाव दिले. अंतराळात वाढवलेल्या वनस्पतीमध्येही पोषकतत्व असतात आणि खाण्यासाठी उत्तम असतात. हे सिद्ध करण्यासाठी तसेच अनेक कारणांसाठी हा प्रयोग केला गेला. 

सुनीता विलियम्स यांनी अंतराळात फक्त लागवडच केली नाही, तर अनेक प्रयोग केले. त्यांनी स्पेस स्टेशन साफ करण्याचेही काम केले. जुन्या उपकरणांची डागडुजी केली. नासाने सांगितले की, त्या दोघांनी अंतराळात १५० प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करून पाहीले आहेत. सुनीता विल्यम्स अंतराळात स्वत:चे स्वास्थ्य चांगले राहावे म्हणून व्यायामही करत होत्या. त्यांनी ६२ तास आणि ९ मिनिटांचा स्पेसवॉक केला आहे. एवढा वेळ स्पेसवॉक करणाऱ्या त्या पहिल्याच महिला अंतराळवीर आहेत. त्यांनी आतापर्यंत ३ स्पेस मिशन्समध्ये भाग घेतला आहे. सुनीता अंतराळात एकूण ६०० दिवस राहिल्या आहेत. 

काही दिवसांसाठी अंतराळात गेलेली ही जोडी ९ महिन्यांनी पृथ्वीवर पुन्हा येणार आहे. विविध तांत्रिक अडचणी आल्यानंतरही त्यांनी निराशा दाखवली नाही. सतत काहीतरी प्रयोग करत राहीले. त्यांनी अंतराळात ९०० तास काम केले.

Web Title: Sunita Williams planted a garden in space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.