lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > बापरे! महिलेच्या पोटात ३५ वर्षांपासून होतं भ्रुण; ५ किलोचा स्टोन बेबी पाहून हादरले डॉक्टर

बापरे! महिलेच्या पोटात ३५ वर्षांपासून होतं भ्रुण; ५ किलोचा स्टोन बेबी पाहून हादरले डॉक्टर

Stone baby fetus found in womb of elderly woman : जेव्हा पोटात दुखण्याचा त्रास उद्भवला तेव्हा या महिलेच्या पोटात गर्भ असल्याचं दिसून आलं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 06:08 PM2021-12-27T18:08:15+5:302021-12-27T18:25:03+5:30

Stone baby fetus found in womb of elderly woman : जेव्हा पोटात दुखण्याचा त्रास उद्भवला तेव्हा या महिलेच्या पोटात गर्भ असल्याचं दिसून आलं. 

Stone baby fetus found in womb of elderly woman who complained stomach pain doctors shocked | बापरे! महिलेच्या पोटात ३५ वर्षांपासून होतं भ्रुण; ५ किलोचा स्टोन बेबी पाहून हादरले डॉक्टर

बापरे! महिलेच्या पोटात ३५ वर्षांपासून होतं भ्रुण; ५ किलोचा स्टोन बेबी पाहून हादरले डॉक्टर

प्रेग्नंसी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा काळ असतो. बाळाची चाहूल लागताच घरातलं वातावरण बदलून जातं. पण सोशल मीडियावर एका महिलेच्या प्रेग्नंसीचा आगळा वेगळा प्रकार समोर आला आहे.  अल्जिरिायाच्या ७३ वर्षांच्या एका महिलेच्या गर्भात स्टोन बेबी   (Stone Baby) दिसून आला.  विशेष म्हणजे ३५ वर्षांपासून हा स्टोन या महिलेच्या गर्भात होता. 

तपासणीनंतर समोर आलं की हा स्टोन सात महिन्यांचा एक भ्रुण आहे.  द सनच्या रिपोर्ट याआधीही या महिलेनं उपचार घेण्याचा प्रयत्न केला होता. पण डॉक्टरांना याबाबत माहिती मिळाली नाही. यावेळी जेव्हा पोटात दुखण्याचा त्रास उद्भवला तेव्हा या  महिलेच्या पोटात गर्भ असल्याचं दिसून आलं. 

भ्रुण ३५ वर्ष या महिलेच्या पोटात होतं

४.५  किलो वजनाचं हे बाळ जवळपास ३५ वर्ष या महिलेच्या पोटात होतं.  पण या भ्रुणामुळे कोणतंही नुकसान झालेलं नाही. कधीकधी किरकोळ वेदना जाणवत होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता जाणवते तेव्हा भ्रुण व्यवस्थित विकसित होत नाही. ज्यामुळे शरीराकडे भ्रुणाला बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नसतो. त्यानंतर हळूहळू भ्रुण दगडात बदलतो. म्हणूनच या महिलेच्या पोटात सापडलेल्या भ्रुणाला स्टोन बेबी असं म्हटलं आहे. 

महिलांच्या शरीरसुखासाठी फोरप्ले आवश्यक असतो, ते का? फोरप्ले म्हणजे काय?

क्लीव्हलँडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल केस मेडिकल सेंटरचे डॉ. किम गार्सी म्हणतात की टिश्यू कॅल्सिफिकेशनमुळे आईला इतर संसर्गापासून संरक्षण मिळते आणि तो दगड अनेक दशकांपर्यंत पोटात राहू शकतो. (Journal of the Royal Society of medicine) बहुतेक वेळा लोक दगड शोधतात आणि पोटात तसाच राहू देतात. जर्नल ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनमधील 1996 च्या रिपोर्टसार, लिथोपेडियनची फक्त 290 प्रकरणे आतापर्यंत आढळली आहेत.

Web Title: Stone baby fetus found in womb of elderly woman who complained stomach pain doctors shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.