Join us  

'तुझी फिगर कर्व्ही..' सोनाली बेंद्रेने सांगितला बॉडी शेमिंगचा भयंकर अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2024 3:48 PM

Sonali Bendre says producers wanted to ‘fatten’ her up during the 90s: ‘They wanted women who were curvaceous and voluptuous’ : एकेकाळी सोनाली बेंद्रेलाही जाड होण्याचा सल्ला दिला गेला कारण..

सध्या लोक आपल्या हेल्थबाबत अधिक सतर्क झाले आहेत (Sonali Bendre). लोक स्वतःची काळजी घेऊन फिट राहत आहे. वजन जरा जास्त वाढलं तर, 'अगं किती लठ्ठ झालीस? तर जर कोणी मुलगी सडपातळ असेल तर, 'अगं तुला कोणी घरी खायला देत नाही का?'... म्हणजे बघायला गेलं तर, जाड असो किंवा बारीक बॉडी शेमिंगचे (Body Shaming) शिकार प्रत्येक जण होतो.

आता बॉलीवूडचंच बघा. अभिनेत्री अंगकाठीने सडपातळ असेल तर, 'अभिनेत्री खूप बारीक आहे' असं म्हणतात. जर जाड असेल तरी देखील तिला ट्रोल केलं जातं, आणि असाच काहीसा बॉडी शेमिंगचा अनुभव, बॉलीवूडची टॉप मोस्ट ब्यूटीफुल अॅक्ट्रेस, सोनाली बेंद्रे हिने शेअर केला आहे. या मराठी मुलगीने अल्पावधीतच सिनेसृष्टीत आपलं नाव गाजवलं. पण सुरुवातीच्या काळी तिला देखील बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले होते. तिने अलीकडेच एका मुलाखतीत याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे(Sonali Bendre says producers wanted to ‘fatten’ her up during the 90s: ‘They wanted women who were curvaceous and voluptuous').

सोनाली बनली बॉडी शेमिंगची शिकार

बॉडी शेमिंगचे शिकार अनेक अभिनेत्री होतात. त्यात सोनाली बेंद्रे हिचा देखील समावेश आहे. '९० च्या दशकात सडपातळ असणाऱ्या अभिनेत्रींना किंवा मुलींना सुंदर म्हटलं जात नव्हतं' असं ती म्हणाली.

घामामुळे कॉलर मळकट झाली? चमचाभर टूथपेस्टचा जबरदस्त उपाय- न घासताही शर्ट दिसेल चकाचक

'अनेकदा माझ्या सडपातळ शरीरयष्टीवरून हिणवलं जायचं. कारण त्या काळात बारीक असणं ही सौंदर्याची व्याख्या नव्हती. माझी अंगकाठी सडपातळ होती. तू कर्व्ही नाहीस म्हणून तू सुंदर नाहीस असंही मला अनेकदा सांगण्यात आलं.' असा खुलासा सोनालीने केला आहे.

फिगरला ब्यूटी स्टँडर्ड मानू नये..

सुटलेलं पोट-वाढलेलं वजन, गॅसेसने त्रस्त? '४' मसाल्यांचे करा मॅजिकल ड्रिंक; आठवडाभरात दिसेल फरक

बॉडी शेमिंगबद्दल सोनाली पुढे म्हणते, 'आजही समाजात बॉडी शेमिंग होताना दिसतं, पण हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. विशेषतः लहान वयातील मुली आजकाल डाएटिंग करताना दिसतात. पण हे त्यांच्यासाठी चांगलं नाही. कारण त्यांना या समाजाकडून संगीतले जाते की, डायटींग करणं किती गरजेचं आहे. लोक विसरत चालले आहेत, की ही गोष्ट इतकी महत्वाची नाही आहे.'

टॅग्स :सोनाली बेंद्रेफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरल