Join us

Social Viral : हेच बाकी होतं! पठ्ठ्यानं रसगुल्ल्यात चटण्या घालून बनवलं 'रसगुल्ला चाट'; व्हिडीओ पाहताच भडकले नेटिझन्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 17:31 IST

Social Viral : सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या एका मिनिटाच्या क्लिपमध्ये असे दिसून येते की, एक माणूस आधी रसगुल्ल्यातून  रस काढत आहे, आणि नंतर प्लेटमध्ये ठेवत आहे. 

रसगुल्ल्याचे नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. याचे एक कारण म्हणजे सर्वाधिक भारतीयांना गोड पदार्थ खूप आवडतात. रसगुल्ल्याचा रसाळ गोडवा जीभेसह मनालाही खूश करतो. मिठाई, पेठे तसंच रसगुल्ल्यांमध्येही वेगवेगळे प्रयोग केले जातात. अनेकदा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रसगुल्ल्यांची चव अनुभवली असेल. पण कधी कधी फारच सुमार दर्जाचे प्रयोग खाद्यपदार्थांमध्ये केले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुम्हालाही राग अनावर होईल. 

खरं तर, प्रत्येकाची स्वतःची आवड निवड असते. पण रसगुल्लाची अशीच एक रेसिपी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओवर संतापजनक कमेंट्स करत आहेत. ही विचित्र रेसिपी पाहून लोक खूप चिडलेले दिसत आहेत.  सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या एका मिनिटाच्या क्लिपमध्ये असे दिसून येते की, एक माणूस आधी रसगुल्ल्यातून  रस काढत आहे, आणि नंतर प्लेटमध्ये ठेवत आहे. 

यानंतर, रसगुल्ला मधूनच कापला जातो आणि चाट मसाला, लाल चटणी, दही, बदाम, काजू आणि मनुका सह सजवले जातात. हा व्हिडिओ ट्विटर युजर @KaptanHindostan  या युजरनं 19 ऑक्टोबरला शेअर केला होता. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले - आम्ही गुन्हेगार आहोत. रसगुल्ला चाट !!!

ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म

या व्हिडीओला ट्विटरवर हजारो लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यासह, शेकडो लोकांनी यावर आपले मत देखील दिले आहे. एका युजरनं म्हटलंय की, मला माहित नाही की, 'असे लोक कुठून येतात, जे लोकांच्या आवडत्या गोष्टीची चव खराब करतात.' या प्रकारच्या रेसिपी याआधीही लोकांना आवडल्या नव्हत्या. याआधी सोशल मीडियावर अनेक विचित्र पाककृतींची खिल्ली उडवण्यात आली होती. आता हे रसगुल्ला चाट पाहून लोक चांगलेच भडकले आहेत. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल