Join us

Social Viral : बाबौ! पाकिस्तानच्या नवविवाहित जोडप्यानं थेट जेसीबी वरून काढली वरात; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:08 IST

Social Viral : सध्या पाकिस्तानमधील लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो थोडा वेगळा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप हसत आहेत.

लग्न हा असा क्षण आहे.  जो अविस्मरणीय असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. यासाठी लोक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून  लग्नाचा दिवस नेहमीच सगळ्यांच्या आठवणीत राहिल. लग्नाचे अनेक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतात. 

सध्या पाकिस्तानमधील लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो थोडा वेगळा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप हसत आहेत. अनेकांनी या आगळ्या वेगळ्या कल्पनेवर कमेंट केली आहे. @ghulamabbassha या ट्विटर युजरने आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानच्या हुंझा व्हॅलीचा असल्याचे सांगितले जात आहे. 

यामध्ये, एक जोडपं लग्नाच्या विधीसाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांची वरात ही आलिशान वाहन किंवा कार नसून जेसीबी आहे. दोघेही जेसीबीच्या पुढच्या भागात उभे आहेत आणि रस्त्याच्या कडेला असलेले लोक त्यांना उत्सुकतेने पाहत आहेत. 

या व्हिडिओवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. लोकांनी असे दृश्य फार क्वचितच पाहिले असेल. जेसीबी संबंधीत मीम्स, रिल्स सोशल मीडियावर खूप कमी वेळात व्हायरल होतात. #jcbkikhudayi एक प्रमुख ट्रेंड राहिला. आता हा व्हिडीओ नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतोय. बस्स, पाकिस्तानमध्ये हेच पाहायचं राहिलं होतं असं एका युजरचं म्हणणं आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियापाकिस्तानलग्न