>सोशल वायरल > Social Viral : चिमुरडी पहिल्यांदाच विमानात गेली; पायलट वडिलांना पाहताच अशी काही रिएक्शन दिली, पाहा व्हिडीओ

Social Viral : चिमुरडी पहिल्यांदाच विमानात गेली; पायलट वडिलांना पाहताच अशी काही रिएक्शन दिली, पाहा व्हिडीओ

Social Viral : या बाप लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून वडील, मुलीची रिएक्शन पाहून लोकांना वेड लावलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 06:26 PM2021-10-13T18:26:49+5:302021-10-13T18:35:19+5:30

Social Viral : या बाप लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून वडील, मुलीची रिएक्शन पाहून लोकांना वेड लावलं आहे. 

Social Viral : little girl sees her pilot dad in the same go air flight her reaction is a viral video | Social Viral : चिमुरडी पहिल्यांदाच विमानात गेली; पायलट वडिलांना पाहताच अशी काही रिएक्शन दिली, पाहा व्हिडीओ

Social Viral : चिमुरडी पहिल्यांदाच विमानात गेली; पायलट वडिलांना पाहताच अशी काही रिएक्शन दिली, पाहा व्हिडीओ

Next

इंटरनेटवर  तुफान व्हायरल होत असलेल्या फ्लाईटमध्ये एक लहान मुलगी दिसून येतेय. त्याच विमानात तिच्या पायलट वडिलांना पाहिल्यानंतर तिनं अशी काही रिएक्शन दिलीये जी पाहून सगळेचजण चकीत झाले आहेत. सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ती विमानाच्या सीटवर बसली आहे. 

हा व्हिडीओ युजर (shanaya_motihar) नं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ही चिमुरडी बसलेली असताना विमानात इतर प्रवासी विमानात चढत असतात. तेव्हा पायलटच्या ड्रेसमध्ये एका व्यक्तीची एंट्री होते. त्या व्यक्तीला बघताच ती चिमुरडी पापा, पापा असा आवाज देते.

विमानात अचानक वडील समोर आल्यानं या चिमुरडीला अत्यानंद होतो. त्याचवेळी तिचे वडील कॉकपीटवर जात असतात. वडिलांनी हात दाखवत मुलीला हॅलो असं म्हटलं. या बाप लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून वडील, मुलीची रिएक्शन पाहून लोकांना वेड लावलं आहे. 

हा व्हिडीओ या चिमुरडीच्या आईनं शूट केल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये इतर मुलीचा उत्साह वाढवण्यासाठी महिला आवाज देताना दिसून येत आहे. या मुलीचे नाव शनाया मोतीहार असून व्हिडीओ बनवत असलेल्या तिच्या आईचं नाव प्रियंका मनोहत आहे. तिच्या आईनंच हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

या व्हिडीओमध्ये कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'वडीलांसोबत माझी पहिली फ्लाईट... त्यांनी दिल्लीकडडे उड्डाण घेतले.  मी खूप उत्साहित आहे. ही माझी आतापर्यंतची सगळ्यात चांगली फ्लाईट आहे. लव्ह यू पापा.' आतापर्यंत ८ लांखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी कमेंटस केल्या आहेत. 
 

Web Title: Social Viral : little girl sees her pilot dad in the same go air flight her reaction is a viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.