Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून नवरदेवानं कपाळावर हात मारला; पाहा 'या' खोक्यात असं आहे तरी काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:05 IST

Social Viral : कमालच केली! लग्नाच्या दिवशी जोडप्यांना मित्रांकडून जबरदस्त गिफ्ट; पाहा या खोक्यात असं आहे तरी काय

लग्नाला जायचं म्हणजे आहेर, गिफ्ट हे सगळं आलंच. मित्राचं किंवा मैत्रिणीचं लग्न असेल तर लोक काय गिफ्ट देतील काहीच सांगता येत नाही. आपल्या मित्राची फजिती करण्याचा एक चान्सही काहीजण सोडत नाहीत. भल्या मोठ्या गिफ्ट पॅकमध्ये छोटंस गिफ्ट, पण ते गिफ्ट काय असेल या उत्सुकतेनं लोक ते उघडत बसतात. असं दृश्य तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. (Viral Video)

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर एसाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल लग्नात मित्रांचा ग्रुप काहीतरी भलं मोठ गिफ्ट घेऊन आला आहे. पण प्रत्यक्षात मात्र हा खोका रिकामा दिसून येतोय. चार- पाचजण  हा खोका उचलून प्रवेशद्वारातून आत आले आणि स्टेजच्या दिशेने गेलेले तुम्ही पाहू शकता.  

हा गिफ्टचा खोका लग्नाला उपस्थित असलेल्या सगळ्यांचच लक्ष वेधून घेतो. कारण या खोक्याला वरून फुलांनी छान सजवलं आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला 648 K लाईक्स मिळाले आहेत. १ हजारापेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. ८० लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

(आला मोठा फोटोग्राफर) या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे भलं मोठ गिफ्ट दिल्यानंतर जोडप्यासोबत त्यांचे मित्रमंडळी फोटोसुद्धा काढतात. त्यानंतर  हा खोका रिकामा असल्याचं लक्षात आल्यानं नवरा मुलगा तो खोका खाली  ठेवून देतो आणि कपाळाला हात लावतो. या गमतीदार दृश्याचा व्हिडीओनं सोशल मीडियावर हशा पिकलाय.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालग्न