Join us

Social Viral : हा असला कसला हट्ट? करीना कपूरसारखी आई बाजारातून विकत आणा, वडिलांकडे चिमुकलीचा हट्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 01:12 IST

Social Viral : लहान मुलं निरागस मनानं कसलाही विचार न करता आपल्या हवं ते आई- वडीलांकडून किंवा आपले लाड करत असलेल्या व्यक्तीकडून मागत असतात. 

लहान मुलं कधी  कोणत्या गोष्टीसाठी हट्ट करतील याचा काही नेम नाही. अनेकदा लहान मुलांच्या हट्टामुळे चारचौघात पालकांना विचित्र वाटतं. मुलांना कुठे बाहेर न्यायलाच नको असं काही पालकांच्या मनात येतं. कारण लहान मुलं निरागस मनानं कसलाही विचार न करता आपल्या हवं ते आई- वडीलांकडून किंवा आपले लाड करत असलेल्या व्यक्तीकडून मागत असतात. 

सध्या सोशल मीडियावर अशाच एक जिद्दी आणि चंचल चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. व्हिडीओत दिसत असलेल्या या चिमुकलीनं आपल्या बाबांकडे एका वेगळ्याच गोष्टीची मागणी केली आहे ती म्हणजे सावत्र आई. 

सध्या सावत्र आईचा हट्ट करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे करीना कपूरसारखी आई बाजारातून आणा असा हट्ट ही मुलगी करत आहे. या चिमुरडीची विनोदी मागणी पाहून सगळेचजण गोंधळले आहेत. ५ मिनिटांच्या या व्हिडीओनं सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. आता हेच बाकी होतं! ऑनलाईन क्लासमध्ये डमी ठेवून खुशाल झोपली; तुफान व्हायरल होतेय ट्रिक

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बर्फी टीव्ही नावाच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत चिमुकली आपल्या वडीलांना सावत्र आई हवी आहे असं सांगत आहे. यावर तिचे वडील म्हणतात की सावत्र आई कुठे मिळते सांग यावर ती म्हणते बाजारात मिळेल तिला फोन करा. ज्या डॉक्टरकडून मूल होण्यासाठी ९ वर्ष उपचार घेतले; त्याच्याच शुक्राणूंमुळे बाळाचा जन्म, डॉक्टरवर गुन्हा दाखल 

टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटके