Join us

असं कुणी गिफ्ट देतं का? लग्नात मिळालेलं अजब गिफ्ट पाहून नवरा-नवरीला आवरेना हसू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 16:59 IST

Social viral: ही तर कमालच झाली बुवा.. काय म्हणावं या गिफ्टला.. अशा पद्धतीचं गिफ्ट (fantastic wedding gift) कुणी कुणाला देतं का.. आणि ते ही लग्नाचा आहेर म्हणून..

ठळक मुद्देस्टेजवर कुणीही नसताना एक महिला नवरा- नवरीजवळ येते. ती स्टेजवर येते तेव्हा........

लग्न म्हटलं की आहेर आलाच.. तुमची उपस्थिती हाच आहेर.. असं पत्रिकेत कितीही मोठ्या अक्षरात छापलं तरी लग्नात हमखास आहेर, गिफ्ट्स (funny gifts for wedding) दिले जातात आणि घेतलेही जातात, हा अनुभव आजवर अनेक जणांनी घेतला असणारचं. आता लग्नातला आहेर म्हणजे एखादी भारीची वस्तू, कपडेलत्ते, घरात लागणारे सामान किंवा अगदी सोन्याचांदीच्या वस्तूही दिल्या जातात. फुलं आणि रोख रकमेच्या स्वरुपात दिला जाणारा आहेरही समजण्यासारखा आहे. पण चक्क एखादी भाजी लग्नाचा आहेर म्हणून मिळते, तेव्हा काय होऊ शकतं... हे हा व्हिडियो (funny video) पाहूनच समजेल...

 

सध्या याविषयीचा एक व्हिडियो सोशल मिडियावर (social media) चांगलाच व्हायरल झाला असून व्हिडियो पाहणारा प्रत्येक जण हे अजब प्रकारचं गिफ्ट पाहून हैराण झाला आहे. इन्स्टाग्रामच्या (instagram) सुरजनिशाद या पेजवर हा व्हिडियो शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांतच हा व्हिडियो एवढा व्हायरल झाला आहे की व्हिडियोला सव्वा लाखापेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

 

त्याचं झालं असं की या व्हिडियोमध्ये एक लग्नमंडप दिसतो आहे. या मंडपात नवरा नवरी अतिशय आनंदात त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत. सगळे पाहूणे लग्नाचा आनंद घेत आहेत. अशावेळी स्टेजवर कुणीही नसताना एक महिला नवरा- नवरीजवळ येते. ती स्टेजवर येते तेव्हा तिचे दोन्ही हात मागे आहेत. नवरा- नवरीजवळ आल्यावर ती तिचे दोन्ही हात पुढे करते आणि त्या नवदाम्पत्याला चक्क दोन मुळे (got radish as their wedding gift) गिफ्ट म्हणून देते.

 

या मॅडम स्टेजवर येऊन आपल्याला असं काही गिफ्ट देतील याची कल्पना त्या बिचाऱ्या नवरा नवरीलाही नव्हती. त्यामुळेच तर हे असं भन्नाट गिफ्ट पाहून त्या दोघांचीही हसून हसून पुरती वाट लागली... आपण दिलेलं हे असं गिफ्ट बघून नंतर गिफ्ट देणाऱ्या महिलेलाही खूपच हसायला येत होतं... 

 

टॅग्स :सोशल व्हायरललग्नइन्स्टाग्रामसोशल मीडिया