lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : धक्कादायक! गर्लफ्रेंडच्या नकळत तिच्या गुप्तांगाचे फोटो काढायचा; अखेर ३ वर्षानंतर भांड फुटलं अन् मग....

Social Viral : धक्कादायक! गर्लफ्रेंडच्या नकळत तिच्या गुप्तांगाचे फोटो काढायचा; अखेर ३ वर्षानंतर भांड फुटलं अन् मग....

Social Viral : .....पण त्याने माझ्यासोबत जे केलं, त्यानंतर मला वाटत नाही की मी पुन्हा कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू शकेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:13 PM2021-11-17T15:13:11+5:302021-11-17T15:28:47+5:30

Social Viral : .....पण त्याने माझ्यासोबत जे केलं, त्यानंतर मला वाटत नाही की मी पुन्हा कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू शकेल.

Social Viral : Boyfriend was jailed for secretly taking naked pictures of girlfriend while she slept | Social Viral : धक्कादायक! गर्लफ्रेंडच्या नकळत तिच्या गुप्तांगाचे फोटो काढायचा; अखेर ३ वर्षानंतर भांड फुटलं अन् मग....

Social Viral : धक्कादायक! गर्लफ्रेंडच्या नकळत तिच्या गुप्तांगाचे फोटो काढायचा; अखेर ३ वर्षानंतर भांड फुटलं अन् मग....

कोणत्याही नात्यात विश्वास फार महत्वाचा असतो. पार्टनरच्या विश्वासाला तडा जाईल असं कोणतंही कृत्य तिनं/त्यानं केल्यास ते नातं टिकवणं कठीण होतं. ब्रिटनमधील (Boyfriend Jailed) एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर तिच्या प्रियकराला तुरुंगात टाकण्यात आले. महिलेचा प्रियकर गुपचूप तिचे अश्लील फोटो (Naked Pictures) काढायचा. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर तिनं लगेचच पोलिस स्थानकात धाव घेतली.  तिच्या म्हणण्यानुसार एके दिवशी महिलेने तिच्या प्रियकराचा मोबाईल तपासला तेव्हा त्यात तिचे अनेक प्रायव्हेट फोटो पाहून तिला धक्काच बसला. हाे समोर आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार केली.  (Boyfriend jailed for secretly taking naked pictures of girlfriend while she slept)

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, २४ वर्षीय लुसी लिअरने (Lucy Lear) २०१३ मध्ये २६ वर्षीय डेल बास्टिनला  (Dale Bastin) डेट करायला सुरूवात केली. २०१५ मध्ये त्यांना एक मूल झालं त्यानंतर हे दोघं वेगळे झाले.  थोडावेळ वेगळं राहिल्यानंतर हे दोघंही एकमेकांतील वाद संपवून पुन्हा एकत्र आले आणि एकत्र राहू लागले. 

दरम्यान, एके दिवशी लुसीने बॅस्टिनचा मोबाइल तपासला आणि तिची झोपच उडाली. बॅस्टिनच्या मोबाईलमध्ये तिचे ३० पेक्षा जास्त नग्नावस्थेतील फोटो होते. हे सगळे फोटो त्यानं तिच्या नकळत क्लिक केले असून तिला याबाबत काही कल्पना नव्हती असं तिनं पोलिसांना सांगितलं. 

महिलेने सांगितले की, ''मी झोपलेली असताना, माझे कपडे  काढण्याचा प्रयत्न करून अशा स्थितीत बास्टिनने गुपचूप फोटो काढले.  हे फोटो २० एप्रिलचे होते त्यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल केली.''  जुलै 2021 मध्ये न्यायालयाने बास्टिनला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टाने बॅस्टिनला लुसीशी पुढील कोणत्याही संपर्कावर बंदी घातली.

महिलेने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, 'मला बास्टिन खूप आवडायचा पण त्याने माझ्यासोबत जे केलं, त्यानंतर मला वाटत नाही की मी पुन्हा कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू शकेल. जेव्हा मी बास्टिनला पहिल्यांदा भेटली तेव्हा मला वाटलं मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असणारी 'जगातील सर्वात भाग्यवान मुलगी' आहे. पण नंतर असं काही होईल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. ''

Web Title: Social Viral : Boyfriend was jailed for secretly taking naked pictures of girlfriend while she slept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.