कोणत्याही देशाचे नागरिकत्व मिळवताना होणारा शपथ विधी हा प्रत्येक अर्जदारासाठी औपचारिक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. दुसर्या देशाचे नियम त्यांच्या रिती याचा आदर ठेऊ आणि नियमांचे पालन करु असे आश्वासन त्या देशातील व्यवस्थेला देण्याचा हा विधी आहे. अनेक भारतीय विविध देशांत स्थलांतरित होतात त्यापैकी एक देश म्हणजे कॅनडा.कॅनडामध्ये २०२१च्या जनगणनेनुसार दहा लाख भारतीय राहतात. त्यात मराठी भाषिकही अनेक आहेत. सध्या सोशल मिडियावर कॅनडामध्ये सिटिझनशिप ओथ घेणारी मुलगी फार चर्चेत आहे. नक्की चर्चेत असण्याचे कारण काय?
ही तरुणी मुळची महाराष्ट्रीय असून तिचे नाव दिव्या लोतलीकर असे आहे. ती सध्या कॅनडामध्ये राहत असून आता तिला कॅनडाची सिटिझनशिपही मिळाली. नागरिकत्वाच्या प्रक्रियेतील अंतिम टप्पा म्हणून होणाऱ्या शपथ विधीत सहभागी होताना, तिने पाश्चिमात्य औपचारिक पोशाखाऐवजी नऊवारी नेसली. त्या प्रसंगी तिने रिल तयार केला आणि तिच्या सोशल मिडिया हॅण्डलवर पोस्ट केला. त्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला आणि लोकांच्या विविध प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या.
नऊवारी साडी ही महाराष्ट्राची शान मानली जाते. फक्त पोशाख नाही तर त्याच्याशी भावना जोडल्या असतात. लग्नाला उभी राहणारी नवरीही नव्या आयुष्याची सुरवात करतानाही नऊवारीच नेसण्याचा हट्ट् करते. ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात या साडीचे स्थान महत्त्वाचेच आहे. अनेक पिढ्यानुपिढ्या ही सण, समारंभ तसेच दैनंदिन आयुष्यातही वापरली जाते. या घटनेत कोणताही नियमभंग किंवा औपचारिक अडथळा निर्माण झाला नाही. शपथ विधी नियमानुसार पार पडला आणि तिने कॅनडाच्या नागरिकत्वाची शपथही घेतली. तिच्या या निवडीमुळे पुन्हा एकदा स्थलांतर, नवीन देशातील नागरिकत्व आणि मूळ संस्कृती यांचा परस्पर संबंध चर्चेत आला. या कमेंट्समध्ये फक्त महाराष्ट्रातील किंवा भारतातील लोकच नाही तर मुळ कॅनडातील लोकही सहभागी झाली.
एकीकडे नवीन देशाची ओळख स्वीकारणे आणि दुसरीकडे आपल्या मूळ परंपरेशी जोडले राहणे, हे अनेक स्थलांतरितांच्या आयुष्यात बदल घडवणारे असते. दिव्याच्या मित्रपरिवाराने तिचे कौतुक केले. तिने पोस्टवर लिहिलेला मजकूर 'नॉट फरगेटींग माय रुट्स' असा होता. माझी संस्कृती मी कधीच विसरणार नाही असा त्याचा अर्थ. त्यावरुन अनेक कॅनडियन लोकांनी मात्र नव्या देशात येताना इकडची संस्कृती स्वीकारा आणि ते जमत नसेल तर तुमच्या देशात परत जा अशा कमेंट्स केल्या. अनेक भारतीयांनीही दुसरीकडे जाऊन अभिमान जागा होतो अशा कमेंट्स केल्या आहेत. फक्त शोबाजीचा प्रकार आहे असं म्हणणाऱ्यांच्या कमेट्स जास्त आहेत.
Web Summary : Divya Lotlikar, a Maharashtrian woman, wore a Nauvari saree while taking her Canadian citizenship oath. This sparked mixed reactions, with some praising her cultural pride and others criticizing her for not embracing Canadian culture. The act ignited discussions about cultural identity and integration.
Web Summary : दिव्या लोटलीकर नामक एक महाराष्ट्रीयन महिला ने नौवारी साड़ी पहनकर कनाडा की नागरिकता की शपथ ली। इस घटना पर मिली-जुली प्रतिक्रियाएं आईं। कुछ लोगों ने उनकी सांस्कृतिक गौरव की सराहना की, जबकि अन्य ने कनाडाई संस्कृति को न अपनाने के लिए उनकी आलोचना की। इस घटना से सांस्कृतिक पहचान और एकीकरण पर चर्चा छिड़ गई।