lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > ''जन्मल्यानंतर ३ दिवस आईनं मला पाहिलंच नव्हतं...'' शार्क टँक इंडिया-3 मध्ये विनिता सिंहना अश्रू अनावर

''जन्मल्यानंतर ३ दिवस आईनं मला पाहिलंच नव्हतं...'' शार्क टँक इंडिया-3 मध्ये विनिता सिंहना अश्रू अनावर

Vineeta Sigh Talks About Her Premature Birth : सीडीसीच्या रिपोर्टनुसार प्रेग्नेंसीत ३७ आठवडे पूर्ण झाल्यानंतर बाळाला गर्भातून बाहेर काढावे लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 11:37 AM2024-04-01T11:37:31+5:302024-04-01T16:08:43+5:30

Vineeta Sigh Talks About Her Premature Birth : सीडीसीच्या रिपोर्टनुसार प्रेग्नेंसीत ३७ आठवडे पूर्ण झाल्यानंतर बाळाला गर्भातून बाहेर काढावे लागते.

Shark tank Indian 3 Judge Ceo of Sugar Cosmetics Vineeta Sigh Talks About Her Premature Birth | ''जन्मल्यानंतर ३ दिवस आईनं मला पाहिलंच नव्हतं...'' शार्क टँक इंडिया-3 मध्ये विनिता सिंहना अश्रू अनावर

''जन्मल्यानंतर ३ दिवस आईनं मला पाहिलंच नव्हतं...'' शार्क टँक इंडिया-3 मध्ये विनिता सिंहना अश्रू अनावर

शार्क टँक इंडिया सिजन ३ मधील जज (Shark tank Indian 3) आपल्या आयुष्यातील सेंसिटिव्ह मुद्द्यावर मोकळेपणाने बोलताना दिसून येत आहेत. अलिकडेच यांनी शुगर कॉस्मेटीकच्या सीईओ आणि को-फाऊंडर विनिता सिंह यांनी खुलासा केला आहे. जन्माच्या ३ दिवसांपर्यंत  त्या आपल्या आई पासून दूर होत्या कारण  त्यांचे प्रिमॅच्युरअर बर्थ झाली होती. सात आठवडे आधी जन्म झाल्यामुळे त्यांना १ आठवड्यापर्यंत इनक्युबेटरमध्ये राहावे लागले होते. (Vineeta Sigh Talks About Her Premature Birth)

आपल्या  प्रिमॅच्युअर बर्थचा खुलासा त्यांनी अशावेळी केला जेव्हा फाऊंडर्स मनोज शंकर आणि प्रत्युषा पारेड्डी यांनी आपले निमो केअर ब्रांडबद्दल सांगितले होते. प्रिमॅच्युर डिलिव्हरी आई आणि मुलगा दोघांसाठीही कठीण असते. अशा स्थितीत बाळाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो. 

प्रिमॅच्युअर डिलिव्हरी

सीडीसीच्या रिपोर्टनुसार जेव्हा प्रेग्नेंसीत ३७ आठवडे पूर्ण झाल्यानंतर बाळाला गर्भातून बाहेर काढावे लागते. जेव्हा डिलिव्हरी वेळे आधीच होते त्याला प्रीमॅच्युर डिलिव्हरी असं म्हणतात. यात बरीच  जोखिम असते. कारण  शेवटचे काही आठवडे बाळाच्या विकासासाठी महत्वाचे असते. यादरम्यान  मुलांना ब्रेन, लंग्स आणि लिव्हर विकसित होत असते. 

प्रत्येक वर्षाला किती प्रिमॅच्युअर बर्थ होतात?

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार जगभरात जन्म घेणारे प्रत्येक दहावं  मुल हे प्रिमॅच्युर असते.  ज्यात प्रत्येक ४० सेकंदात  एकाचा मृत्यू होतो. आकडेवारीनुसार २०२० मध्ये जवळपास १३.४ मिलियन लोकांची प्रिमॅच्युर डिलिव्हरी झाली ज्यात १ मिलियन मुलांचा मृत्यू झाला.

केस गळणं वाढलंय? जावेद हबीब सांगतात किचनमधला १ पदार्थ वापरा; झुपकेदार-दाट होतील केस

प्रिमॅच्युर डिलिव्हरीची कारणं काय

जास्तीत जास्त प्रिमॅच्युर डिलिव्हरी वैद्यकीय कारणांमुळे होते. जसं की  डायबिटीस, इन्फेक्शन किंवा प्रेग्नंसी कॉम्पलिकेशन्समुळे होते. यासाठी अधिक रिसर्चची आवश्यकता असते.  प्रिमॅच्युर डिलिव्हरीच्या आधी ही लक्षणं दिसून येतात पाठीच्या मागच्या भागात वेदना होतात, पेल्विसमध्ये दबाव जसं की मुलं खाली ढकललं जात आहे, हात आणि पायांमध्ये वेदना, चेहऱ्याला सूज, एक तासाच चारपेक्षा अधिकवेळा कॉन्ट्रॅक्शन, ऊलट्या होणं, डोळ्यांना न दिसणं, मासिक पाळीत वेदना होणं.

दिग्दर्शक बोनी कपूर यांचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन चर्चेत; ५ गोष्टींनी पटकन घटवलं वजन-वेट लॉस सिक्रेट

प्रिमॅच्युर बर्थ रोखण्याचे उपाय

नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डायबिटीस, उच्च रक्तदाब कोणत्याही आरोग्य विषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार घ्या आणि गर्भावस्थेत जास्तीत जास्त काळजी घ्या. 

Web Title: Shark tank Indian 3 Judge Ceo of Sugar Cosmetics Vineeta Sigh Talks About Her Premature Birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.