Lokmat Sakhi >Social Viral > सेरेना विल्यम म्हणते केले मी ‘ओझेम्पिक’ने वजन कमी, जगभरातून टिका-खप्पड दिसण्यातून काय साधले?

सेरेना विल्यम म्हणते केले मी ‘ओझेम्पिक’ने वजन कमी, जगभरातून टिका-खप्पड दिसण्यातून काय साधले?

Serena Williams says she lost weight with Ozempic, people say why to do so ? see what kind of pills she took ? : गोळ्या घेऊन केले वजन कमी. सेरेना विल्यम्सचा अनुभव.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2025 14:24 IST2025-08-25T14:21:16+5:302025-08-25T14:24:52+5:30

Serena Williams says she lost weight with Ozempic, people say why to do so ? see what kind of pills she took ? : गोळ्या घेऊन केले वजन कमी. सेरेना विल्यम्सचा अनुभव.

Serena Williams says she lost weight with Ozempic, people say why to do so ? see what kind of pills she took ? | सेरेना विल्यम म्हणते केले मी ‘ओझेम्पिक’ने वजन कमी, जगभरातून टिका-खप्पड दिसण्यातून काय साधले?

सेरेना विल्यम म्हणते केले मी ‘ओझेम्पिक’ने वजन कमी, जगभरातून टिका-खप्पड दिसण्यातून काय साधले?

एककाळ होता जेव्हा टेनिस खेळात महिला फार आघाडीवर नव्हत्या आणि महिलांना टेनिस नीट खेळता येत नाही असे मानले जायचे. त्या काळात सेरेना विलियम्स ही एक अशी खेळाडू होती जिने महिलाही या खेळात मागे नाहीत हे सिद्ध केले. सेरेना प्रचंड फिट होती. तिचे अॅब्स आणि बॉडी भल्याभल्या जीम ट्रेनर्सपेक्षाही मस्त होती. सेरेना आता ४३ वर्षाची आहे. वयानुसार ताकद कमी होते आणि आता खेळत नसल्याने तिचे शरीरही जरा बदललेले दिसते. सेरेनाला दोन मुलेही आहेत. २०१७ ला सेरेनाला एक मुलगी झाली. त्यानंतर तिचे वय झपाट्याने वाढायला लागले. २०२३ साली तिला दुसरी मुलगी झाली आणि त्यामुळे तिची दिनचर्याच बदलून गेली होती. मात्र आता सेरेनाने जवळपास १४ किलो वजन कमी केले. जीम डाएटने कमी न होणारे वजन तिच्या एका औषधामुळे कमी झाल्याचे तिने सांगितले. 

टाइप-२ डायबिटीज बरा करण्यासाठी आणि रक्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी GLP-1 (Ozempic) हे औषध काही जण घेतात. हे औषध फार प्रभावी असते. हार्मोन्सवर त्याचा परिणाम होतो. सेरेनाही हेच औषध घेत होती. या औषधामुळे रक्तदाब तर नियंत्रित होतोच मात्र त्यामुळे भूक कमी होते. ही गोळी घेतल्यानंतर काहीही खायची इच्छा होत नाही. पोट भरल्याची भावना या गोळीमुळे टिकून राहते. इन्सुलिन व्यवस्थित काम करते. त्यामुळे हळूहळू कॅलरिज कमी होतात. भूक कमी झाली, कॅलरिज कमी झाल्या की वजनही आपोआप कमी व्हायला लागते. सेरेनाचे १४ किलो वजन याच गोळीमुळे कमी झाले. 

सेरेनाचे हे रुटीन सोशल मिडियावर फार व्हायरल झाले. त्यावर अनेकांनी आपल्या भूमिका मांडल्या. अनेकांचे म्हणणे असे आहे की जर एका एवढ्या फीट खेळाडूलाही वजन कमी करण्यासाठी गोळी घ्यावी लागली तर सामान्य लोकांचे वजन कमी होणे किती जास्त कठीण असू शकते. (Serena Williams says she lost weight with Ozempic, people say why to do so ? see what kind of pills she took ?)तसेच अनेक जण म्हणतात की, आता या वयात एवढं फिट न दिसणंही ठीक आहे. त्यासाठी गोळ्या घ्यायची गरज नाही. पंन्नाशी आल्यावर जरा थकणे नैसर्गिक आहे. मात्र सेरेना म्हणते तिला आता फार समाधान वाटते. तिला वजन कमी करायचेच होते आणि ते या मार्गाने कमी झाले. त्यात काही चूक नाही. ही तिची वैयक्तिक बाब आहे.     

Web Title: Serena Williams says she lost weight with Ozempic, people say why to do so ? see what kind of pills she took ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.