lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > सासरी जाणाऱ्या परिणिती चोप्राला सानिया मिर्झाने दिलं अश्रू पुसणारे गिफ्ट, आहे काय 'ती' खास भेटवस्तू

सासरी जाणाऱ्या परिणिती चोप्राला सानिया मिर्झाने दिलं अश्रू पुसणारे गिफ्ट, आहे काय 'ती' खास भेटवस्तू

Special Gift To Parineeti Chopra From Sania Mirza: स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने अभिनेत्री परिणिती चोप्राला तिच्या लग्नात एक खास गिफ्ट दिले आहे... त्या गिफ्टची चर्चा सध्या सोशल मिडियावर व्हायरल आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 12:37 PM2023-10-04T12:37:51+5:302023-10-04T12:38:40+5:30

Special Gift To Parineeti Chopra From Sania Mirza: स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने अभिनेत्री परिणिती चोप्राला तिच्या लग्नात एक खास गिफ्ट दिले आहे... त्या गिफ्टची चर्चा सध्या सोशल मिडियावर व्हायरल आहे...

Sania Mirza gave special gift to actress Parineeti Chopra on her wedding | सासरी जाणाऱ्या परिणिती चोप्राला सानिया मिर्झाने दिलं अश्रू पुसणारे गिफ्ट, आहे काय 'ती' खास भेटवस्तू

सासरी जाणाऱ्या परिणिती चोप्राला सानिया मिर्झाने दिलं अश्रू पुसणारे गिफ्ट, आहे काय 'ती' खास भेटवस्तू

Highlightsआता यानंतर तुमच्या एखाद्या मैत्रिणीचं लग्न असेल तर तुम्हीही असे छानसे गिफ्ट कस्टमाईज करून तुमच्या मैत्रिणीला देऊ शकता.

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आप नेते राघव चड्डा (Parineeti Chopra and Raghav Chadhdha) हे दोघे नुकतेच विवाह बंधनात अडकले. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला परिणितीची खास मैत्रीण म्हणजेच स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाही उपस्थित होती. या सोहळ्यासाठी सानियाने घातलेल्या महागड्या ड्रेसची तर चांगलीच चर्चा झाली. पण आता चर्चा आहे ती तिने परिणितीला लग्नात दिलेल्या एका खास गिफ्टची. (Sania Mirza gave special gift to actress Parineeti Chopra)

 

या गिफ्टचे आणि परिणितीचे आणि तिचे काही फोटो सानियाने नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले आहेत. लग्न लागल्यानंतर परिणितीच्या लगेचच उपयोगात येईल असं आहे हे गिफ्ट.

मुलीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून वडिलांनी दिली घाणेरड्या पाण्याची बाटली! असे कसे वडील, असे का केले त्यांनी.. वाचा..

स्पेशल असलं तरी ते खूप काही वेगळं आहे असं मात्र मुळीच नाही. फक्त ते कलात्मकतेने दिलं आहे म्हणून त्याची चर्चा आहे. सानियाने परिणितीसाठी खास कस्टमाईज रुमाल करून घेतले आणि ते आकर्षक पद्धतीने सजवून परिणितीला दिले. ''Should our wedding cause you to shed a tear Use this handkerchief to make it disappear.'' असा मेसेज ही तिने या रुमालावर लिहिला आहे

 

आता लग्न म्हटलं की नवरीच्या डोळ्यात थोडेफार अश्रू येतातच. तसे अश्रू परिणितीच्याही डोळ्यात येतील याचा विचार करून सानियाने हे खास गिफ्ट तिच्या मैत्रिणीला दिलं आहे.

बटाटे चिरल्यानंतर पाण्यात का भिजवावे? आणि किती वेळ? बघा काय आहे त्यामागचं वैज्ञानिक कारण

बघा आता यानंतर तुमच्या एखाद्या मैत्रिणीचं लग्न असेल तर तुम्हीही असे छानसे रुमाल कस्टमाईज करून तुमच्या मैत्रिणीला देऊ शकता.

 

Web Title: Sania Mirza gave special gift to actress Parineeti Chopra on her wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.