Join us

Sai pallavi : समोर आला साई पल्लवीचा पारंपारीक बंगाली वेडींग लूक; पाहा तिचे स्टायलिश हटके फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 14:12 IST

Sai pallavi : . या अभिनेत्रीनं सुंदर बंगाली वधूप्रमाणे लूक केलेला दिसून येत आहे. फोटोमध्ये साई खर्‍या बंगाली नववधूसारखी दिसते.

दक्षिण भारतीय अभिनेत्री सई पल्लवीनं आपला साधेपणा आणि अभिनयाच्या जोरावर वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. शिक्षणाने एक डॉक्टर आणि व्यवसायाने एक अभिनेत्री, सईच्या साधेपणाने आणि पॉवरहाऊस कामगिरीनं ती देशभरातील घराघरात पोहोचली. तिची लोकप्रियता केवळ दक्षिण भारतापुरती मर्यादित नाही तर देशाच्या उत्तर भागातही या अभिनेत्रीचा चाहतावर्ग आहे. लोकप्रियतेमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या आगामी चित्रपटासाठीचे लग्नाचे नवीन शूट व्हायरल झाले आहे. (Sai pallavis stylish bengali wedding pictures go viral)

पल्लवीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर लग्नाची काही फोटो पोस्ट केले आहेत. या अभिनेत्रीनं सुंदर बंगाली वधूप्रमाणे लूक केलेला दिसून येत आहे. फोटोमध्ये साई खर्‍या बंगाली नववधूसारखी दिसते, बंगाली वेडिंग स्टाईलमध्ये क्लासिक गोल्ड बॉर्डर असलेली लाल साडी त्यावर कॉन्ट्रास्ट हिरवा ब्लाउज, पारंपारिक बंगाली मुकुट नथनी, बांगड्या आणि चंदन बिंदी अशा पारंपारीक शृंगारात साईचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.  आगामी चित्रपट श्याम सिंगल रॉयच्या शुटिंगदरम्यान साईचा हा लूक व्हायरल झाला. 

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. काही महिन्यांपूर्वी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका साई पल्लवी हिला एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी साई पल्लवीला २ कोटी रूपये इतके मानधन मिळणार होते.  सेलिब्रिटी स्वत: स्वप्नातही या फेअरनेस क्रिमचा वापर करणार नाहीत. पण पैशासाठी या क्रिमच्या जाहिराती करताना मात्र ते जराही कचरत नाहीत. पण तत्त्वांपुढे पैसा महत्त्वाचा नाही, असे म्हणून साईने म्हणे या २ कोटी रूपयांवर पाणी सोडले. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियासाई पल्लवी