lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Safety Tips for using gas geyser : गॅस गिझरमुळे वैमानिकाचा गुदमरून मृत्यू: घरात गॅस गिझर वापरत असाल तर ८ गोष्टींची खबरदारी घ्या...

Safety Tips for using gas geyser : गॅस गिझरमुळे वैमानिकाचा गुदमरून मृत्यू: घरात गॅस गिझर वापरत असाल तर ८ गोष्टींची खबरदारी घ्या...

Safety Tips for using gas geyser : आंघोळीच्या गरम पाण्यासाठी अनेकांकडे गॅस गिझर वापरला जातो. वेळेला पटकन गरम पाणी मिळत असले तरी हा गिझर वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी, नाहीतर जीवावर बेतू शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 04:03 PM2022-02-09T16:03:04+5:302022-02-09T16:06:54+5:30

Safety Tips for using gas geyser : आंघोळीच्या गरम पाण्यासाठी अनेकांकडे गॅस गिझर वापरला जातो. वेळेला पटकन गरम पाणी मिळत असले तरी हा गिझर वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी, नाहीतर जीवावर बेतू शकते.

Safety Tips for using gas geyser: Pilot suffocates to death due to gas geyser: If you are using gas geyser at home, take care of 8 things ... | Safety Tips for using gas geyser : गॅस गिझरमुळे वैमानिकाचा गुदमरून मृत्यू: घरात गॅस गिझर वापरत असाल तर ८ गोष्टींची खबरदारी घ्या...

Safety Tips for using gas geyser : गॅस गिझरमुळे वैमानिकाचा गुदमरून मृत्यू: घरात गॅस गिझर वापरत असाल तर ८ गोष्टींची खबरदारी घ्या...

Highlightsरात्री झोपताना किंवा गावाला जाताना गॅस सिलिंडरचे आणि गिझरचे असे दोन्ही कनेक्शन पूर्णपणे बंद करा.  गॅस गिझरला काही झाले आहे असे वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने दुरुस्ती करुन घेणे गरजेचे आहे. गॅस गिझरची ठराविक कालावधीने तपासणी करत राहा.

थंडीच्या दिवसांत आंघोळीसाठी गरमागरम पाणी तर सगळ्यांनाच लागते. आता पूर्वीसारखे चुलीवर किंवा गॅसवर पाणी गरम करुन घ्यायची पद्धत काहीशी मागे पडली आणि घरोघरी गॅस गिझर किंवा बॉयलर दिसू लागले. घाईच्या वेळी पटकन गरम पाणी मिळण्यासाठी हे पर्याय चांगले असले तरी ते वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. नाहीतर या साधनांमुळे होणारे अपघात आपल्या जीवावर बेतू शकतात Safety Tips for using gas geyser. अशाप्रकारच्या गॅसगिझरमुळे अपघात झाल्याच्या आणि त्यामुळे प्राण गमावल्याच्या बातम्याही आपण अनेकदा वाचतो. मात्र आपल्या घरात असलेल्या या वस्तूकडे आपण म्हणावे तितके लक्ष देत नाही.

घाईघाईत आपण गॅसगिझरचा गरजेपुरता वापर करतो आणि आपल्या कामाला निघून जातो. नाशिक येथील वैमानिक महिलेचा नुकताच गॅस गिझरमधील गॅस गळतीने गुदमरुन मृत्यू झाला. एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या रश्मी गायधनी मुठे या वैमानिक अवघ्या ४८ वर्षांच्या होत्या. इतकेच नाही तर त्याआधी काही दिवस नाशिकमध्येच गॅस गिझरच्या गळतीने आणखी एका तरुणीचाही मृत्यू झाला होता. अशा घटना वारंवार घडत असल्याने गॅस गिझर वापरणे धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे गॅस गिझर कितीही सोयीचा वाटत असला तरी तो वापरताना खबरदारी घ्यायला हवी हेच खरे.

(Image : Google)
(Image : Google)

गॅस गिझर वापरताना ही काळजी घ्या

१. गॅस गिझरमुळे होणाऱ्या दुर्घटना प्रामुख्याने बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नसल्याने होतात. त्यामुळे बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी ‘एक्झॉस्ट फॅन’ बसवणे आवश्यक आहे. अनेकदा बाथरुम बंद असल्याने आतमध्ये ऑक्सिजन नसतो, त्यामुळे गॅस गळतीनंतर गुदमरुन मृत्यू होण्याच्या दुर्घटना घडतात. 

२. गॅस गिझरमुळे बाथरुममध्ये वाफ तयार होते. बाथरूमधून वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्यास मोठ्या प्रमाणावर वाफ साठत जाते आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परिणामी, तेथे कार्बन डायऑक्साईड तयार होण्यास सुरवात होते. कार्बनडाय ऑक्साईड वाढला की आत असणाऱ्या व्यक्तीला श्वसनाला त्रास होतो आणि अचानक त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे बाथरुममधून हवा बाहेर जाईल यासाठी असणारी लहान खिडकीची सोय योग्य पद्धतीने केलेली आहे ना याची वारंवार लक्षपूर्वक तपासणी व्हायला हवी. 

३. गॅस गिझर खरेदी केल्यानंतर त्याची फिटिंग प्रशिक्षित व्यक्तींकडून योग्य ठिकाणी करून घ्यावी. माहिती नसलेल्या व्यक्तीकडून चुकीची जोडणी केली गेल्यासही गॅस गळतीचा धोका उद्भवू शकतो. अनेकदा घरच्या घरी आम्हाला अमुक काम येते असे म्हणून गॅस गिझरची जोडणी केल्यास त्यामध्ये काही चुका राहू शकतात आणि अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

४. गॅस गिझरची जोडणी करताना त्यामध्ये अनेक बारीक सारीक गोष्टी असतात. जसे गॅस पुरवठ्यासाठी फक्त रबरी पाइप न वापरता त्याला कॉपर फिटिंग करून घेणे आवश्यक असते. पण याची योग्य ती माहिती नसल्यास अचानक एखादवेळी अपघात घडतो आणि तो जीवावर बेतणारा ठरु शकतो. 

५. गॅस गिझरमध्ये गळती झाल्यास त्यातून कार्बन मोनोऑक्साइड वायू बाहेर पडतो. यामुळे चक्कर येणे, मळमळ, उलट्या, थकवा आणि पोटदुखी होऊ शकते. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे या यासारख्या समस्याही निर्माण होतात. आंघोळ करताना किंवा नंतर अशी कोणतीही समस्या वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लगेचच डॉक्टरांकडे जायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

६.  बाथरूममध्ये आंघोळ सुरू करण्यापूर्वी गॅस गिझर बंद करा. त्यामुळे आंघोळ करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. 

७. गॅसचा वास येणे, बाथरुममध्ये वाफा दिसणे यांसारख्या गोष्टींकडे लक्ष द्या. गॅस गिझरला काही झाले आहे असे वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने दुरुस्ती करुन घेणे गरजेचे आहे. गॅस गिझरची ठराविक कालावधीने तपासणी करत राहा.

८. गॅस गिझरचा सिलिंडर बाथरुममध्ये न ठेवता तो बाहेर राहील याची काळजी घ्या, म्हणजे लीक झाला तरी बाथरुममध्ये गुदमरायला होणार नाही. तसेच शक्यतो घरातील सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर गॅस गिझर पूर्णपणे बंद करा. रात्री झोपताना किंवा गावाला जाताना गॅस सिलिंडरचे आणि गिझरचे असे दोन्ही कनेक्शन पूर्णपणे बंद करा.  

Web Title: Safety Tips for using gas geyser: Pilot suffocates to death due to gas geyser: If you are using gas geyser at home, take care of 8 things ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.