Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > रिपोर्टरनं शिक्षिकेला जानेवारीचं स्पेलिंग विचारलं, त्यावर तिनं दिलेलं उत्तर ऐकून पोट धरून हसाल

रिपोर्टरनं शिक्षिकेला जानेवारीचं स्पेलिंग विचारलं, त्यावर तिनं दिलेलं उत्तर ऐकून पोट धरून हसाल

Reporter Asks Teacher Spelling Of January viral Video :

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 17:20 IST2022-08-30T16:59:38+5:302022-08-30T17:20:54+5:30

Reporter Asks Teacher Spelling Of January viral Video :

Reporter asks january spelling in english from school teacher watch her funny reply in viral video | रिपोर्टरनं शिक्षिकेला जानेवारीचं स्पेलिंग विचारलं, त्यावर तिनं दिलेलं उत्तर ऐकून पोट धरून हसाल

रिपोर्टरनं शिक्षिकेला जानेवारीचं स्पेलिंग विचारलं, त्यावर तिनं दिलेलं उत्तर ऐकून पोट धरून हसाल

सोशल मीडियावर कधी, काय व्हायरल होईल याची कोणालाच कल्पना नसते. अनेकवेळा असे मजेदार व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहून हसताना पोटात दुखू लागते आणि असे व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघायला भाग पाडले जाते. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक रिपोर्टर शिक्षिकेला स्पेलिंग विचारत आहे. त्यावर शिक्षिकेनं असे उत्तर दिले की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पत्रकाराने शिक्षकाला काय विचारले आणि शिक्षकाने काय उत्तर दिले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, जो खूपच मजेदार आहे. (Reporter asks january spelling in english from school teacher watch her funny reply in viral video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक रिपोर्टर हातात माइक घेऊन उभा आहे आणि त्याच्यासोबत काही मुले आणि एक शिक्षकही उभे आहेत. (Reporter Asks Teacher Spelling Of January viral Video) हा व्हिडिओ एखाद्या गावातील असल्याचं दिसत आहे. रिपोर्टर शिक्षिकेला म्हणतो जानेवारीचे स्पेलिंग इंग्रजीत सांगा. शिक्षिका म्हणते, मुलेही हे स्पेलिंग सांगतील. तुम्ही त्यांना विचारा. तेव्हा एका मुलाने जानेवारीचे चुकीचे स्पेलिंग सांगितले.

त्यावेळी शिक्षिका जानेवारीचे चुकीचे स्पेलिंग मोठ्या आत्मविश्वासाने सांगते. व्हिडिओमध्ये शिक्षिका ज्या आत्मविश्वासाने चुकीचे स्पेलिंग सांगत आहेत. ते ऐकून हसताना लोकांच्या पोटात दुखायला लागते. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर the.innocent.br0 नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 12 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. 
 

Web Title: Reporter asks january spelling in english from school teacher watch her funny reply in viral video